Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 14 January, 2009

सावधान, तुमचा मोबाईलही 'हॅक' होऊ शकतो

पुणे, दि. १३ (प्रतिनिधी): 'ईमेल' व संकेतस्थळे "हॅक' करून हॅकर ज्याप्रमाणे त्याचा गैरवापर करतात तोच प्रकार आता मोबाईलबाबतही सुरू असल्याने त्यासंदर्भात दक्षतेचा इशारा या क्षेत्रातील तज्ज्ञ देऊ लागले आहेत. इतकेच नव्हे तर आयटी तज्ज्ञांकडून तशा प्रकारचे ईमेल पाठवले जात असून मोबाईल कंपन्यांनीही या तज्ज्ञांच्या म्हणण्याला दुजोरा दिला आहे.
मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर तर आता मोबाईलधारकांनी अधिकच सावध राहण्याची गरज असल्याचे या तज्ज्ञांचे मत आहे. मोबाईलधारकाला आपण कॉल सेंटरवरून अथवा कंपनीच्या कार्यालयातून बोलत असल्याचा फोन येतो, त्यात मोबाईलसंबधी तसेच संबंधित व्यक्तीसंबंधी काही माहिती हवी आहे, व त्यासाठी अमूक एक बटण डायल करा, असे सांगितले जाते. अनेकदा संबंधित मोबाईलधारक अनवधानाने किंवा खरेच माहिती हवी असेल असे समजून ते बटन दाबतो व येथेच तुमचा मोबाईल "हॅक' केला जातो. असे एखादे बटण दाबले तर आपला मोबाईल प्रत्यक्ष ताब्यात न घेताही संबंधित व्यक्ती त्याचा हवा तसा गैरवापर करू शकते, असे या तज्ञांचे म्हणणे आहे. त्यावेळी अशी काही सूचना आपल्याला कोणी अनोळखी व्यक्ती करत असेल तर ताबडतोब तो कॉल बंद करायची खबरदारी घेणे गरजेचेआहे. कारण कंपनीकडून बोलणारी व्यकती अशा प्रकारचे विशिष्ट बटण दाबण्यास कधीच सांगत नाही. चुकून जरी हे बटण आपण दाबले तरी आपले सिमकार्ड परस्पर वापरण्याचा "ऍक्सेस' अशा सूचना देणाऱ्या व्यक्तीला मिळत असतो व एकदा हा "ऍक्सेस' मिळाला की आपल्या मोबाईलचा हवा तसा वापर ही व्यक्ती करू शकते. त्यामुळे त्याबाबत अत्यंत सावध राहण्याची गरज हे तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
एखाद्या मोबाईलवर आलेला किंवा मोबाईलवरून केलेला कॉल कोठून आला याचा तपास करता येतो. मात्र आजकाल बाजारात सुळसुळाट झालेल्या चीनी मोबाईलवर त्यासाठी आवश्यक असलेला इएमएआय नंबरच नसल्याने हा तपास होऊ शकत नाही. सरकारने चीनी मोबाईलच्या विक्रीवर बंदी घातली असूनही हे मोबाईल पुण्यामुंबईसारख्या ठिकाणी मुबलक संख्येने उपलब्ध आहेत. कमी किंमती आणि आकर्षक रचना व विविध सोयींमुळे या मोबाईलना मागणीही प्रचंड आहे मात्र तरीही ते सुरक्षित नसल्याने वापरू नयेत असेही या तज्ज्ञांचे मत आहे.

1 comment:

Unknown said...

nice information

Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!

Online Survey Website
Free Survey Website
Survey Websites in Canada
Survey Websites in India
Earn Money from Home
Free Online Surveys