Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 14 January, 2009

नव्या संकुलात जाण्यास गाडेधारकांचा विरोधच

पणजी, दि. १३ (प्रतिनिधी): नव्या बाजार संकुलात जागा वाटप करतेवेळी गाडेधारकांना कोणतीही लेखी माहिती दिली नाही, किंवा विश्वासत घेतले नाही. त्याचप्रमाणे पणजीचे आमदार तथा विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर व ताळगावचे आमदार तथा शिक्षणमंत्री बाबूस मोन्सेरात यांनी या प्रश्नावर योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन दिले असताना, महापालिका घाई का करते, असा प्रश्न शहर गाडेमालक संघटनेचे सचिव कानोबा नाईक यांनी उपस्थित केला आहे. "पंधरा दिवसच काय, वीस दिवस झाले तरी, आम्ही नव्या बाजार संकुलातील जागेचा ताबा घेणार नाही,' असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
पणजीत ८८ गाडेधारक आहेत. मग, पालिकेने २१३ गाड्यांचे वाटप कोणाला केले, असाही प्रश्न श्री. नाईक यांनी महापालिकेला केला आहे. काल दि. १२ जानेवारी रोजी दुपारी पणजी पालिकेने शहरातील गाडेधारकांना नव्या बाजार संकुलातील पहिल्या मजल्यावर गाडे उपलब्ध करून दिले. या गाड्यांचा ताबा घेण्यासाठी केवळ पंधरा दिवसांची मुदत शहरातील गाडेधारकांना दिली आहे. तळ मजल्यावर जागा दिली जात नाही तोपर्यंत, आम्ही या गाड्यांचा ताबा घेणार नाही, अशी भूमिका सिने नॅशनलकडील गाडेधारकांनी घेतली आहे. जुन्या गाडेधारकांच्या नावाने महापालिका नव्या व्यक्तींना याठिकाणी घुसडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही श्री. कानोबा यांनी केला.
नव्या बाजार संकुलातील या गाड्यांचा ताबा घेतला जावा, असे कोणतेही लेखी पत्र आमच्यापर्यंत आलेले नाही. तसेच न्यायालयाचा कोणताही अवमानही आम्ही केलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. त्याउलट महापालिकेनेच न्यायालयाचा अवमान केल्याचे श्री. नाईक म्हणाले. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने शहरातील गाडेवाल्यांची कायमस्वरूपी सोय होत नाही, तोपर्यंत त्यांच्यासाठी खास योजना राबवण्याचे आदेश महापालिकेला दिले होते. परंतु, पालिकेने अद्याप कोणतीही योजना गाडेधरकांसाठी केलेली नाही, असे ते म्हणाले.
दरम्यान, महापालिकेने आज सकाळी व सायंकाळी दुकानदारांनी फुटपाथवर ठेवलेले सामान उचलून नेण्याचे काम हाती घेतले. यावेळी ट्रक भरून सामान पालिकेने ताब्यात घेतले.

1 comment:

Unknown said...

nice information

Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!

Online Survey Website
Free Survey Website
Survey Websites in Canada
Survey Websites in India
Earn Money from Home
Free Online Surveys