Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday 15 January, 2009

लोकसभा निवडणूक एप्रिल - मे दरम्यान, अधिकृत घोषणा १० मार्च रोजी

नवी दिल्ली, दि. १४ : येत्या एप्रिल व मे महिन्यांत लोकसभेसाठी महिनाभर नऊ टप्प्यांत निवडणूक होणार असल्याचे आज स्पष्ट झाले. पहिला टप्पा १० एप्रिल रोजी सुरू होऊन १० मे रोजी संपूर्ण प्रक्रिया संपेल. निवडणूक आयोगातर्फे याबाबतची अधिकृत घोषणा १० मार्च रोजी करण्यात येणार असून, त्या दिवसापासून आचारसंहिता अमलात येईल,अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
प्रत्यक्ष मतदानाचा पहिला टप्पा एप्रिलच्या उत्तरार्धात सुरू होईल, तोपर्यंत शालेय परीक्षा संपलेल्या असतील आणि शिक्षकांना निवडणूक कामासाठी नियुक्त करण्यात अडथळा राहणार नाही. दहशतवादाच्या पार्श्वभूमीवर एकाच वेळी अनेक ठिकाणी केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान पाठविण्यास गृह मंत्रालयाने असमर्थता दर्शविल्याने मतदान अनेक टप्प्यांत घेणे आयोगाला भाग पडले आहे. सुरक्षा जवानांची पथके वेगवेगळ्या ठिकाणी पाठविणे अपरिहार्य असल्याने आयोगाने सध्या सात टप्प्यांत मतदान घेण्याचे ठरविले आहे. गरज भासल्यास नऊ टप्प्यांत मतदान होईल, असे आयोगाच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे. केंद्रीय सुरक्षा पथके पाठविण्याबाबत आयोगाने गृह मंत्रालयाशी चर्चा सुरू केली आहे.
लोकसभेचे अंतिम अधिवेशन १३ फेब्रुवारीस सुरू होत आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार ते २० किंवा २६ तारखेपर्यंतच चालेल. या कालावधीत लेखानुदान संमत करण्यात येईल. अंदाजपत्रक जूनअखेरीस मांडणे नव्या सरकारला शक्य होईल. जून ४ पर्यंत सर्व निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईल. मुख्य निवडणूक आयुक्त एन. गोपालस्वामी यांचा कार्यकाळ २० एप्रिल रोजी संपत आहे, त्यावेळी फक्त पहिला टप्पा संपलेला असेल. वादग्रस्त ठरलेले आयुक्त नवीन चावला हे ज्येष्ठतेने नवे मुख्य आयुक्त ठरतील.मावळते मुख्य आयुक्त गोपालस्वामी यांनी राष्ट्रपतींना जर प्रतिकूल शिफारस केली, तर वेगळी नियुक्ती होऊ शकेल. सध्या चावला हे निवडणूक कामात भाग घेत आहेत.

1 comment:

Unknown said...

nice information

Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!

Online Survey Website
Free Survey Website
Survey Websites in Canada
Survey Websites in India
Earn Money from Home
Free Online Surveys