Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday 12 January, 2009

गतवर्षी २२० कोटींची मालमत्ता वाचवली

अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालयाची उल्लेखनीय कामगिरी
पणजी, दि.११ (प्रतिनिधी): गोवा अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालयाने गतवर्षी उल्लेखनीय कामगिरी करून सुमारे २२० कोटी रुपयांची मालमत्ता वाचवली. अग्निशमन दलाच्या जवानांनी विविध आगीच्या घटना तथा इतर आपत्कालीन प्रसंगी आपल्या जिवाची पर्वा न करता बजावलेल्या सेवेत १३३ मनुष्यांचे तसेच १६३ मुक्या जनावरांचे प्राणही वाचवले. राज्यात घडलेल्या विविध आग दुर्घटना तथा इतर अपघातांमध्ये झालेल्या हानीचा आकडा सुमारे ४२ कोटी रुपये असल्याची अशी माहिती खात्याचे संचालक अशोक मेनन यांनी "गोवादूत'शी बोलताना दिली.
नागरिकांच्या सुरक्षेसह मालमत्तेच्या सुरक्षेची जबाबदारी स्वीकारून आपले कार्य बजावणाऱ्या गोवा अग्निशमन व आपत्कालीन सेवा संचालनालयाने गेल्या २००८ साली केलेल्या कामाचा अहवाल श्री. मेनन यांनी समोर ठेवला. गेल्यावर्षी संचालनालयाच्या विविध विभागात सुमारे ३८३२ "कॉल्स' आल्याची माहिती त्यांनी दिली. त्यात १६७८ आगीसंबंधी व २१५४ इतर आपत्कालीन घटनांसंबंधी होते. गेल्यावर्षी घडलेल्या विविध आगीच्या घटनेत एकूण ९ तर इतर अपघातात १५५ जणांना आपले प्राण गमवावे लागले तर २०४ जण जखमी झाले. प्राण्यांचे जीव वाचवण्यासाठी दलाच्या जवानांनी बरेच श्रम घेतले. अशा घटनांत १८ प्राणी मृत्युमुखी पडले तर १६३ प्राण्यांचे जीव वाचवण्यात आले. यात ४ जनावरे जखमी झाली.
केवळ अग्निशमन प्रकरणी सेवा बजावणाऱ्या या संचालनालयाची व्याप्ती आता मोठ्या प्रमाणात वाढली असून आपत्कालीन सेवेतही दलाच्या जवानांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. बदलत्या काळानुसार संचालनालयाला नव्या अत्यावश्यक सेवासुविधांनी उपयुक्त ठेवण्यासाठी विविध प्रस्ताव केंद्र तथा राज्य सरकारला सादर केल्याची माहिती श्री. मेनन यांनी दिली. विविध अद्ययावत उपकरणे तथा अपघात किंवा आपत्कालीन प्रसंगी उपयुक्त ठरणारी उपकरणे खात्याने मिळवली असून त्यामुळे जीवित तथा वित्त हानी टाळणे सोपे बनले आहे, असेही त्यांनी सांगितले. मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ला प्रकरणी उद्भवलेल्या परिस्थितीत मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी वठवलेली भूमिका महत्त्वाची होती व आता गोव्यातील अग्निशमन दलही दहशतवादी हल्ला किंवा तत्सम संकटांना तोंड देण्यास सज्ज ठेवण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केल्याचेही ते म्हणाले.
----------------------------------------------
३८३२ "कॉल्स'
१६७८ आगीसंबंधी तर २१५४ आपत्कालीन घटना
२२० कोटी रुपयांच्या मालमत्तेचे रक्षण
१३३ मनुष्य तथा १६३ मुक्या जनावरांना जीवदान

1 comment:

Unknown said...

nice information

Join the finest minds in consumer research. Share your unique opinion and get paid for doing online surveys for money. You can share your opinion and earn per survey by making Money Online Now!

Online Survey Website
Free Survey Website
Survey Websites in Canada
Survey Websites in India
Earn Money from Home
Free Online Surveys