Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 7 March, 2008

करार की सत्ता? कॉंग्रेससमोर पेच

नवी दिल्ली, दि. ७ ः मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने काल अणुकरारासंबंधी समन्वय समितीची बैठक बोलाविण्याची मागणी केली असताना आज एक पाऊल पुढे टाकीत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस ए.बी. बर्धन यांनी पंतप्रधानांना एक पत्र पाठवून, करारासंबंधी कोणतीही हालचाल केल्यास पाठिंबा काढून घेण्याचा निर्वाणीचा इशारा दिला. या पत्रामुळे कॉंग्रेस पक्षात खळबळ माजली असून पक्षाध्यक्ष सोनिया गांधी व पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी अन्य घटक पक्षांशी आज संध्याकाळी सल्लामसलत केली. डाव्यांच्या विरोधाला कसे सामोरे जावे, याबाबत विचारविनिमिय करताना, कॉंग्रेस नेते अखेर निवडणूक घ्यायला प्राधान्य देतील अशी चिन्हे दिसत आहेत. करार की सत्तात्याग असा प्रश्न या नेत्यांपुढे आज उपस्थित झाला आहे.
सोनिया गांधी यांनी कॉंग्रेसच्या मुख्य नेत्यांशी आज रात्री विशेष चर्चा केल्याने लोकसभा बरखास्तीची व निवडणुकीसंबंधीची शक्यता वाढली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डाव्या पक्षांचे सहकार्य टिकविण्यासाठी कराराला मूठमाती द्यावी, असाही विचारप्रवाह आहे.

No comments: