Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 7 March, 2008

वीस क्रशरांची घरघर बंद

अकरा खाणींची वीज तोडली
मडगाव, दि. ७ (प्रतिनिधी)ः मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार सासष्टी मामलेदारांनी काल पाहणी केल्यानंतर आज गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अधिकृत परवाना नसलेल्या २० क्रशरांना टाळे ठोकले तर पाषाणी दगडांच्या ११ खाणींचा वीजपुरवठा तोडला.
मामलेदार परेश फळदेसाई यांनी कडक पोलिससंरक्षण घेऊन आज ही कारवाई केली. सांजुझे आरियाल, नेसाय, गुडी पारोडा व सारझोरा येथील हे क्रशर बंद करण्यात आल्याची माहिती मामलेदार कार्यालयातील सूत्रांनी दिली. आज ही कारवाई करताना प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेली यादी पडताळून पाहिली जात होती.
मिळालेल्या माहितीनुसार, कालच्या पाहणीअंती या भागात एकूण ४८ क्रशर असल्याचे आढळून आले असून उर्वरितांवर उद्या कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. खंडपीठाने कारवाईसाठी चार दिवसांची मुदत दिलेली असून ती रविवारपर्यंत आहे. आजच्या कारवाईनंतर क्रशर व खाणमालकांची तारांबळ उडाली आहे. अद्याप मालक सापडत नसलेल्या खाणींचा वीजपुरवठा या कारवाईत तोडला आहे.

No comments: