भारतीय भाषा सुरक्षा मंचाचा इशारा
मडगाव दि. २८ (प्रतिनिधी): भारतीय भाषा सुरक्षा मंचातर्फे आज (दि.२८) येथे झालेल्या जिल्हास्तरीय बैठकीत शिक्षण हक्क कायद्यात कोणताही बदल करण्याचा तसेच शिक्षण धोरणाला हात लावण्याचा अधिकार गोवा सरकारला नाही असे बजावले. तसेच इंग्रजी प्राथमिक शाळांना अनुदान दिले जाऊ नये यासाठी लढा देण्याचा निर्णय घेऊन त्यासाठी राज्यभर मेळावे व सभा घेण्याचे ठरले. एका गटाच्या दडपणाला बळी पडून सरकारने शिक्षण धोरणात बदल केल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील व राज्यव्यापी आंदोलन छेडले जाईल असा इशारा दिला गेला.
येथील महिला नूतन हायस्कूलमध्ये झालेल्या या बैठकीत अरविंद भाटीकर, प्रा. सुभाष वेलिंगकर, कांता पाटणेकर, प्रशांत नाईक व इतरांनी मार्गदर्शन केले व मातृभाषेतून प्राथमिक शिक्षणाचा जगन्मान्य सिद्धांंताविरुद्ध वावरणार्या धर्मांध शक्तींना ठेचून काढण्यासाठी पालकांनी जागृत होऊन पुढे येण्याची गरज प्रतिपादन केली.
श्री. भाटीकर यांनी आपल्या घणाघाती भाषणात कॉंग्रेस सरकार सासष्टीतील आपल्या आमदारांच्या दडपणाला बळी पडून भारतीय भाषांचा गळा घोटू पहात असेल तर त्याचा तो डाव कदापि यशस्वी होणार नाही असे बजावले. सरकारने अपप्रचाराला बळी न पडता वस्तुस्थिती पडताळून पहावी असे सुचविले.
प्रा. वेलिंगकर यांनी मंचाने आजवर घेतलेल्या जागृती कार्यक्रमाचा आढावा घेतला व आता येत्या २ ते ८ मे दरम्यान राज्यभर जागृतीसाठी तालुकास्तरीय मेळावे घेऊन समित्या स्थापन केल्या जातील असे सांगितले. त्यांनी मातृभाषेतून शिक्षण हा घटनात्मक अधिकार असल्याचे सांगून भारतीय भाषा शिक्षण कायद्यात बंधनकारक करण्यात आल्याचे सांगितले. त्यांनी याबाबत सतर्क राहाण्याचे पालकांना आवाहन केले.
प्रशांत नाईक यांनी गोव्यात सरकारने शिक्षण धोरणात कोणताही बदल केला तर तो मंच कदापि खपवून घेणार नाही असा इशारा दिला. त्यासाठी किरकोळ आंदोलन होणार नाही तर संपूर्ण गोव्यातील जनजीवन विस्कळित करणारे ते आंदोलन राहिल असे सांगितले.
कांता पाटणेकर यांनी मातृभाष्ेतून प्राथमिक शिक्षण घेतल्याखेरीज खरा विकास होत नाही असे सांगून जगभर तो सिद्धांत आचरला जात असताना भारतच त्याला अपवाद का असा सवाल केला.
Friday, 29 April 2011
पत्रकारितेतील मानदंड हरपला
• विष्णू सूर्या वाघ
गोमंतकीय पत्रकारितेची परंपरा फार मोठी आहे. डॉ. टी. बी. कुन्हा, भारतकार हेगडे देसाई यांच्यासारख्या लढाऊ पत्रकारांनी तिचा पाया घातला. बा. द. सातोस्कर, द्वा. भ. कर्णिक, माधवराव गडकरी, लक्ष्मीकांत बोरकर, चंद्रकांत केणी, सीताराम टेंगसे, वामन राधाकृष्ण, तुकाराम पोेकजे, दत्ता सराफ, लक्ष्मण जोशी, सुरेश वाळवे, अशा अनेक पत्रकारांनी तिला सौष्ठव प्राप्त करून दिले अन् गोमंतकीय पत्रकारितेला खर्या अर्थाने लोकाभिमुख बनवले. मात्र या पत्रकारितेला कळसापर्यंत पोहोचवण्याचे काम जर कोणी केले असेल तर ते नारायण आठवले यांनी.
आजचे वर्तमानपत्र हे उद्याची रद्दी असते हा सर्वमान्य समज खोटा ठरवताना वर्तमानपत्र हे सामाजिक क्रांतीचे आणि बंडाचेही अग्रदूत ठरू शकते हे आठवले यांनी दाखवून दिले. त्यांच्या पत्रकारितेचा इतिहास संघर्षाने, भारलेला आहे. विद्यार्थी दशेपासूनच चळवळीची आवड असलेल्या आणि लेखणीची तलवार बनवून लोकांसाठी लिहिण्याची स्वप्ने पाहणार्या नारायणराव आठवलेंनी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात जीव तोडून काम केले. त्यांचा पिंड समाजवादी वृत्तीचा होता. पण इतर समाजवाद्यांप्रमाणे मिळमिळीत लिहिणे आणि मुळमुळीत बोलणे त्यांच्या स्वभावात नव्हते. वाणी आणि लेखणी दोन्हींचे फटकारे ते सारख्याच जोरकसपणे मारत होते.
कुठल्यातरी कारणावरून अत्र्यांशी त्यांचा वाद झाला आणि भर सभेत अत्रे बोलत असताना आपले पायताण त्यांनी अत्र्यांच्या दिशेने फेकून दिले. तेव्हापासून नारायण आठवले हा पत्रकारितेमधला एक उर्मट टग्या आहे अशी प्रतिमा निर्माण केली गेली. एका अर्थाने ते खरेही होते. पण आठवलेंच्या टगेगिरीला तुकोबांच्या वाणीचे आणि ज्योतिबा फुलेंच्या लेखणीचे भरभक्कम अधिष्ठान होते. भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे काठी हाणू माथा अशी त्यांची रोखठोक वृत्ती होती. पण कठीण वज्राला भेदत असतानाही या अवलियाचे काळीज माणुसकीच्या वेडाने भरले होते. अन्याय बघितला की ते पेटून उठायचे आणि दुःख पाहिले की वितळून जायचे. म्हणूनच एकीकडे पोर्तुगीज कवी कोमोईशविरुद्ध जनमत तयार करताना त्यांची लेखणी तलवार बनली आणि दुसरीकडे मूकबधिर मुलांचे गार्हाणे लोकांसमोर मांडून लोकविश्वास प्रतिष्ठान स्थापन करताना त्या लेखणीतून उसळलेल्या अश्रूंची फुले झाली. मडकईच्या होडी दुर्घटनेत बळी पडलेल्या मृतांच्या कुटुंबीयांचे उद्ध्वस्त संसार आठवले यांनी उभे करून दिले आणि दुसरीकडे मराठी कोकणी भाषावादात राजकीय सत्तेपुढे दुर्बळ झालेल्या मराठीप्रेमींना लोकशक्तीचे अधिष्ठान मिळवून दिले. गोमंतकात संपादक म्हणून रुजू होण्यापूर्वी प्रभंजन या साप्ताहिकाचा संपादक म्हणून नाना आठवले, प्रबोधनकार ठाकरेंच्या जाज्ज्वल्य विचारांचा वारसाही चालवीत होते. १९७७ साली आणीबाणी लादण्यात आली. तेव्हा इंदिरा गांधींच्या एकाधिकारशाहीविरुद्ध लढा देण्यासाठी सुरुवातीला जी मंडळी पुढे आली त्यात नानाच आघाडीवर होते. इंदिराजींनी लादलेल्या सेन्सॉरशिपला चोख उत्तर देताना प्रभंजनच्या मुखपृष्ठावर,
‘पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा विजय असो!’
‘इंदिरा गांधी यांचा विजय असो!’
‘गांधी यांचा विजय असो!’
‘यांचा विजय असो!’
‘विजय असो!’
‘असो!’
असा क्रमाक्रमाने एकेक शब्द गाळत इंदिराजींची हुर्यो उडवण्याचा धाडसीबाणा त्यांनी त्यावेळी गाजवला होता.
दै. गोमंतकच्या प्रारंभीच्या कालखंडात बा. द. सातोस्कर यांच्यानंतर संपादक पदाची धुरा माधवराव गडकरी यांनी पत्करली. गडकरी हे स्वतंत्र गोव्याने पाहिलेले पहिले लोकाभिमुख पत्रकार. त्यांच्यानंतर नारायण आठवले यांनी लोकांत मिसळणारा संपादक कसा असतो हे गोव्याला दाखवून दिले. सुरुवातीला ते गोव्यात आले. तेव्हा फारसे कोणी त्यांना ओळखत नव्हते. केसांची जुल्फे कपाळावर आलेला, पानाने ओठ रंगवणारा, भेदक नजरेने समोरच्याच्या काळजाचा ठाव घेणारा, सहसा सफारीमध्ये वावरणारा हा तुंदिलतनू संपादक गोमंतकमध्ये आल्यावर लेखणीइतकीच आपली जीभही सराईतपणे चालवू लागला. कोणाचाही मुलाहिजा न ठेवणारा पत्रकार म्हणून त्यांची ओळख झाली. भ्रष्ट राजकारण्यांचे बुरखे टराटरा फाडणारा संपादक म्हणून ते प्रस्थापित झाले. संपादकीयांची शैली त्यांनी बदलून टाकली. आठवलेंचे संपादकीय हे खर्या अर्थाने जनमताचे प्रतिबिंब होते. कारण त्यातून लोकभाषेचे यथार्थ दर्शन होत होते. अग्रलेखांना सणसणीत मथळे देणे हा त्यांचा डाव्या हाताचा खेळ होता. त्यांच्या एकेका मथळ्याने अनेकदा राजकारणी गारद होत. त्याचबरोबर अनिरुद्ध पुनर्वसूपासून संपादकीय पानावरच्या आठव्या कॉलममध्ये आठवा स्तंभ लिहायचे तेव्हा अत्यंत मनस्वी, हळुवार आणि भावुकही व्हायचे.
गोमंतकभवनमधील चौथ्या मजल्यावरील त्यांच्या खोलीत खिडकीपाशी येणारे कावळे, चिमण्या, खारोट्या, मांजरी, त्यांच्या लेखांचे विषय बनायचे. चालू घडामोडीवर ओवीबद्ध छंदातून रविवार गाथा लिहिताना ते नारायण महाराज बनायचे. गोमंतक सोडल्यानंतर अनेक वर्षे चित्रलेखा साप्ताहिकातून महाराष्ट्र माझा हे सदर त्यांनी चालवले. त्यातही आपला लढाऊ बाणा त्यांनी कधी सोडला नाही. याच चित्रलेखात सख्याहरी बनून अत्यंत मिस्कील शैलीत सामाजिक घडामोडींवर भाष्य करण्याची हातोटी, त्यांनी आत्मसात केली होती. पत्रकारितेशिवाय कथा, कादंबरी, असे साहित्यप्रकारही त्यांनी हाताळले. साहित्यातील त्यांचे सर्व लिखाण अनिरुद्ध पुनर्वसू याच नावाने होत असे. त्यांच्या कादंबर्यांनी एकेकाळी ना. सी. फडके यांच्याप्रमाणेच तरुणवर्गाला वेड लावले होते. महात्मा फुलेंच्या जीवनावर त्यांनी लिहिलेली प्रभंजन ही कादंबरी त्यांच्या साहित्य संभाराचा मुकुटमणी ठरावी इतकी परिपूर्ण आणि शैलीदार आहे. नाना मध्यंतरी शिवसेनेच्या तिकिटावर निवडून येऊन लोकसभही गेले. मात्र राजकारण हा त्यांचा पिंड नव्हता. ते जन्मजात पत्रकार होते. फक्त पत्रकारच नव्हे तर पत्रकारांची कार्यशाळा होती. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन मी, ज्ञानेश महाराव, यांच्यासारखे अनेकजण लिहिते झाले. नानांनी गोव्यासाठी खूप काही दिले आहे. लोकविश्वास प्रतिष्ठान गोमंतक मराठी अकादमी, यासारख्या संस्था त्यांच्या पुढाकाराने निर्माण झाल्या. मराठी चळवळीसाठी झोळी घेऊन लोकांमध्ये जात त्यांनी निधी जमवला. आठवलेंनी साद घातली आणि गोमंतकीयांनी प्रतिसाद दिला नाही असे क्वचितच घडले असेल. गोमंतकीय वाचकांनीही त्यांच्यावर मनापासून प्रेम केले. गोव्यामधील आपल्या वास्तव्यात नारायण आठवले आणि अनुराधा आठवले या दाम्पत्याने खूप काही दिले. वाचकाला बाणेदार बनवले. लढवय्यांची एक नवी पिढी निर्माण केली. गोव्याच्या अस्तित्वासाठी लढा देणारे जे अनेक घटक आज आपल्याला दिसतात त्यांच्या जडणघडणीत आठवलेंचा वाटा फार मोठा आहे. त्यांच्या निधनाने पत्रकारितेचे नुकसान तर झालेच आहे पण गोवेकरांच्या गोयकारपणाला दिशा दाखवणारा ताठ कण्याचा दीपस्तंभ आज कोलमडून पडला आहे. नारायण सुर्वे यांच्यानंतर शब्दांच्या अंगणातला हा दुसरा नारायण. त्यांच्या मावळण्याने विषण्णतेचा अंधार माझ्याच नव्हे तर हजारोंच्या मनात दाटून आला आहे. नानांची प्रेरणा आम्हांला सदैव वाट दाखवत राहो हीच याक्षणी प्रार्थना.

सरकारी वकिलांच्या तडकाफडकी बदल्या
पणजी, दि. २८ (प्रतिनिधी): गृहखात्याने आज तडकाफडकी जल्हा न्यायालयातील सरकारी वकील आणि साहाय्यक सरकारी वकिलांच्या बदलीचा आदेश काढून खळबळ माजवून दिली. उत्तर जिल्हा न्यायालयातील चार साहाय्यक सरकारी वकिलांची बदली दक्षिण गोवा जिल्हा न्यायालयात तर दक्षिणेतील दोन साहाय्यक सरकारी वकिलांची बदली उत्तर गोवा जिल्हा न्यायालयात करण्यात आली आहे.
गृहखात्याचे अवर सचिव व्ही. पी. डांगी यांनी आज सायंकाळी काढलेल्या आदेशानुसार सरकारी वकील सरोज सार्दिन, भानुदास गावकर, प्रमोद हेदे व आशा आर्सेकर यांची मडगाव येथून पणजी येथे बदली करण्यात आली. तर पणजी येथील शिर्रील मोन्तेरो, सुनिता नागवेकर, कृष्णा संझगिरी व सुभाष देसाई यांची मडगाव येथे बदली झाली आहे. पणजीतील सरकारी वकील पूनम भरणे, प्रतिमा वेर्णेकर व मिलेना पिंटो यांची म्हापसा न्यायालयात बदली करण्यात आली आहे.
साहाय्यक सरकारी वकिलांमध्ये रेमंड गोन्साल्वीस (मडगाव ते फोंडा), सत्यवान आर. देसाई (केपे ते वास्को), अनुराधा तळावलीकर (पणजी ते म्हापसा), नीता जी. मराठे (पणजी ते फोंडा), क्लॅरिटा सिमोयस (म्हापसा ते वास्को), सुषमा एन. नाईक मांद्रेकर (पणजी ते पेडणे), विसिताको जी. कॉस्ता (फोंडा ते मडगाव), फ्रान्सिस नरोन्हा (पेडणे ते पणजी), रॉय डिसोझा (डिचोली ते म्हापसा), राल्सटोन बार्रेटो (वास्को ते म्हापसा), अर्चना भोबे (म्हापसा ते फोंडा), अन्ना आर. ब्रागांझा ई मेडोंझा (म्हापसा ते डिचोली), देवानंद कोरगावकर (वास्को ते मडगाव), उत्कर्ष आवडे (काणकोण ते मडगाव), तेमा एस. नार्वेकर (डिचोली ते पणजी), गोविंद गावकर (सांगे ते काणकोण), संजय सामंत (मडगाव ते वास्को), शिल्पा नागवेकर (वास्को ते केपे), दर्शन डी. गावस (मडगाव ते म्हापसा), रोड्रिगीस कोलेमा साव्हियो ईनफेन्स (फोंडा ते सांगे) व शिवराम पाटील यांची मडगाव ते अभियोग संचालनालयात बदली करण्यात आली आहे.

आदित्य आर्य नवे पोलिस महासंचालक
पणजी, दि. २८ (प्रतिनिधी): गोवा पोलिस महासंचालक भीमसेन बस्सी यांची बदली झाली असून त्यांच्या जागी दिल्ली पोलिस खात्यात वाहतूक विभागात महत्त्वाची कामगिरी बजावलेले आदित्य आर्य यांची गोवा पोलिस महासंचालकपदी वर्णी लागली आहे. या विषयीचा आदेश केंद्रीय मंत्रालयाने काढला आहे.
भीमसेन बस्सी यांनी सप्टेंबर २००९मध्ये गोवा पोलिस खात्यात महासंचालकपदी नियुक्त झाले होते. त्यांच्या जागी आत आदित्य आर्य यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. आर्य हे १९८१ बॅचचे आयपीएस अधिकारी असून सध्या दिल्ली पोलिस खात्यात सह आयुक्तपदी रुजू आहे. दिल्ली येथे कॉंग्रेस नेत्याच्या नावावर असलेला ‘तंदूर खून’ प्रकरणाचा तपास लावण्यास श्री. आर्य यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तसेच, दिल्ली येथे पोलिस नियंत्रण कक्ष अद्ययावत करण्यासही त्यांचा मोलाचा वाटा आहे.

Thursday, 28 April 2011
मिकींना एक वर्ष तुरुंगवास
• वीजअभियंता मारहाण प्रकरण भोवले
मडगाव, दि. २७ (प्रतिनिधी): कपील नाटेकर या वीज अभियंत्याला तो सरकारी ड्युटीवर असताना मारहाण केल्याप्रकरणी बाणावलीचे आमदार फ्रान्सिस्क ऊर्फ मिकी पाशेको यांना भा. दं. सं. च्या कलम ३५३ खाली दोषी ठरवून त्यांना एक वर्ष साधा तुरुंगवास व पाच हजार रु. दंड अशी शिक्षा ठोठावणारा महत्वपूर्ण निवाडा आज येथील अतिरिक्त प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी देविदास केरकर यांनी दिला आहे. या निवाड्याचे गोव्याच्या राजकारणावर व मिकी यांच्या राजकीय भवितव्यावर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आज दुपारी भरगच्च न्यायालयात निवाडा वाचताना न्यायमूर्तींनी मिकी यांची ३४२ (कोंडणे) व ५०४ (अर्वाच्च शिवीगाळ करणे) या कलमांखालील आरोपांतून मुक्तता केली पण ३५३ कलमाखालील गुन्हा हा अत्यंत गंभीर स्वरुपाचा असून आरोपीकडून भविष्यात त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून त्याला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी ही सरकारपक्षाची विनंती उचलून धरताना ही शिक्षा फर्मावली.
आरोपीस या शिक्षेविरुद्ध वरच्या न्यायालयात जाण्यासाठी न्यायाधीशांनी नंतर या निवाड्याच्या कार्यवाहीस महिनाभरापुरती स्थगिती दिली. आरोपीने दंड भरला तर तो सरकारजमा केला जावा व तो भरला नाही तर आणखी एक महिना तुरुंगवास भोगावा असेही या निवाड्यात पुढे न्यायमूर्तींनी म्हटले आहे.
दिनांक १५ जुलै २००६ रोजी घडलेल्या या प्रकरणी २१ मे २००९ रोजी आरोपपत्र दाखल झाले होते. तेही एका वेगळ्या परिस्थितीत. मिकी मंत्री असल्याने त्यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यास पोलिसांनी तब्बल तीन वर्षे काढली. अखेर ऍड. आयरिश रॉड्रगिस यांनी पोलिसांना कायदेशीर नोटीस देऊन आरोपपत्र सादर करण्यासाठी ४८ तासांची मुदत दिली अन्यथा उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा देताच खळबळ माजली व २१ मे २००९ रोजी आरोपपत्र दाखल केले गेले. गेली दोन वर्षे हा खटला चालला व त्यात ७ साक्षीदार तपासले गेले.
त्यावेळी पशुसंवर्धन व कृषीमंत्री असलेल्या मिकी पाशेको यांनी बेताळभाटी येथील आपल्या कार्यालयात वीज अभियंता असलेल्या कपील नाटेकरला बोलावून घेतले होते. यावेळी शिवराळ भाषा वापरून नाटेकर यांच्या सरळ मुस्कटात हाणली होती. तेव्हा नाटेकर हे सरकारी ड्युटीवर होते. नंतर या प्रकरणी कोलवा पोलिसांत मिकीविरोधात तक्रार झाली होती व त्यांनी तपास करून खटला दाखल केला होता.
न्या. केरकर यांनी आपल्या १६ पानी निवाड्यात आरोपीच्या वकिलांनी कोणत्याही मुद्यावर त्याला दोषी ठरवू नये. तो गोव्यातील मंत्री तसेच राजकीय नेता आहे व समाजात त्याला मान-प्रतिष्ठा आहे. त्याचा हा पहिलाच गुन्हा आहे व म्हणून शिक्षा फर्मावताना सौम्य दृष्टिकोन बाळगावा व ताकीद देऊन त्याची मुक्तता करावी अशी जी विनंती केली होती ती साफ फेटाळून लावली. कायदा हा सर्वश्रेष्ठ आहे. कोणीही आपली बेकायदा कृत्ये पचवण्यासाठी आपल्या हातातील राजकीय सत्तेचा वापर करू शकत नाही असे बजावले.
या खटल्यात एकूण ७ साक्षीदार तपासले गेले. फिर्यादीला कार्यालयात कोंडून ठेवले व शिवीगाळ केली हे आरोप मात्र सिद्ध झाले नाहीत. फिर्यादी स्वतः आरोपीच्या कार्यालयातून दार उघडून बाहेर आला व त्यावरून त्याला कोंडून ठेवलेले नव्हते तसेच आरोपीने नेमकी कशी शिवीगाळ केली तेही तक्रारीत नमूद केलेले नसल्याने ते सिद्ध होत नाही असे न्यायाधीशांनी नमूद केले आहे. मात्र फिर्यादीबरोबर गेलेला वीज खात्याचा वाहन चालक व दुसरा अभियंता बार्बोजा यांनी दिलेली साक्ष, त्यांनी लॉगबुकवर केलेली नोंद, फिर्यादीसंदर्भात डॉक्टरी अहवाल यावरून त्याला मारहाण झाल्याचे सिद्ध होते. सरकारी ड्युटीवरील कर्मचार्याला मारहाण करणे ही गंभीर बाब असल्याचे प्रतिपादन करत ही शिक्षा ठोठावली आहे. सरकारच्या वतीने ऍड. कु. एस. गावडे तर मिकी पाशेकोंच्या वतीने ऍड. श्रीकांत नाईक यांनी काम पाहिले.
----------------------------------------------------------------
मिकी दाद मागणार
आज न्यायालयात सुनावणीवेळी मिकी पाशेको हजर होते. नंतर लगेच ते निघून गेले पण निवाड्याची प्रत घेण्यासाठी त्यांना बोलावून घेण्यात आले. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी न्यायालयीन निवाड्याबद्दल संपूर्ण आदर व्यक्त करून या निवाड्याविरुद्ध वरच्या न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले.
वरकरणी त्यांनी या निवाड्याचा आपणावर फारसा परिणाम झालेला नाही असे दाखविले पण नंतर ज्या प्रकारे ते ज्या प्रकारे निघून गेले त्यावरून ते बरेच हादरलेले दिसले. कारण अशा प्रकरणात न्यायालयात शिक्षा ठोठावलेले गोव्यातील ते पहिलेच आमदार तथा माजी मंत्री ठरलेले आहे. त्यांच्या अनेक भावी योजनांनाही या निवाड्यामुळे सुरुंग लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हक्क मिळेपर्यंत कावरेतून खाणवाहतूक नाही
• आदिवासी समितीचा इशारा
केपे, दि. २७ (वार्ताहर): कावरे परिसरातून होणार्या खनिज वाहतुकीमुळे येथील आदिवासी लोकांना आपल्या शेती-बागायतीवर पाणी सोडण्याची वेळ आलेली आहे. सदर बागायती टिकवून ठेवण्यासाठी कावरेवासीयांनी चालू केलेला लढा सुरूच राहणार आहे. जोपर्यंत आम्हांला आमचा हक्क मिळत नाही तोपर्यंत कावरेतून खनिज वाहतूक सुरू करू देणार नाही असा कडक इशारा कावरे आदिवासी बचाव समितीचे अध्यक्ष नीलेश गावकर यांनी कावरे येथे समितीने घेतलेल्या बैठकीत दिला.
आज सदर बैठक घेण्यात आली. यावेळी बैठकीला गोयच्या शेतकर्यांचो एकवोट, गोयच्या राखणदारांचो आवाज, कुडतरीचो एकवोट, युनायटेड फार्मर मोरपिर्ला, कोळंब बचाव समिती व इतर समित्यांचे सदस्य उपस्थित होते.
ही बैठक संध्याकाळी ५ वा. कावरे येथे सुरू झाली. बराच वेळ चाललेल्या या बैठकीचा लोकांत जागृती करणे हा मुख्य उद्देश होता. कावरेवासीयांनी सुरू केलेल्या आंदोलनाला लोकांचे सहकार्य मिळवणे हा प्रमुख उद्देश यामागे होता. बैठकीला सुमारे २०० ग्रामस्थ उपस्थित होते.
या बैठकीत पुढे बोलताना श्री. गावकर म्हणाले की, आम्ही सुरू केलेला हे आंदोलन अखेरपर्यंत चालू ठेवणार आहोत. त्याकरिता गावच्या लोकांचा व इतर राज्यांतील लोकांनीही सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. सरकारला सामान्य लोक दिसत नाहीत तर फक्त पैसा दिसतो असा आरोप यावेळी श्री. गावकर यांनी केला. या भागात आदिवासी लोक राहत नाहीत असा अहवालही पाठवण्यात आला असून या लहान समाजाचे सरकारला काहीच पडलेले नाही. आमच्या हक्काकरिता आम्हांला कोणतीही शिक्षा दिली तरी आम्ही आमच्या हक्काकरिता अखेरपर्यंत लढू असा निर्धार यावेळी गावकर यांनी व्यक्त केला.
बैठकीत बोलताना जॉन फर्नांडिस यांनी हा लढा पुढे लढण्यासाठी सर्वांनीच आपापसातील मतभेद विसरून एकत्र यावे असे आवाहन केले. ही आमची भूमी आम्ही सांभाळून ठेवली नाही तर आमची पुढील पिढी आम्हांला शाप देईल. असे सांगत श्री. फर्नांडिस यांनी पैशांच्या मागे धावू नका. आमच्या पूर्वजांनी सांभाळलेली ही भूमी त्यांच्यासारखीच आम्हीही सांभाळायला हवी. आम्हांला संरक्षण हवे असेल तर दुसर्यावर अवलंबून राहू नका. तसेच मायनिंग मालकांच्या आमिषाला बळी पडू नका असे आवाहन यावेळी श्री. फर्नांडिस यांनी केले.
गोयच्या राखणदाराचो आवाजचे राजेंद्र काकोडकर यांनी सांगितले की, आपापसातील मतभेद विसरून एकत्र रहा. एकोपा सांभाळा. ध्येय घेऊन पुढे जा. आजवर जसे यश मिळाले आहे तसेच यश पुढेही मिळणार आहे. फक्त त्यासाठी एकजूट महत्त्वाची आहे. असे आवाहन केले.
शेतकर्यांचो एकवोटच्या झरिना डिकूना यावेळी, भूमीवर होणारा अत्याचार सहन करत बसू नका. आपण आपल्या जमिनी सांभाळल्या पाहिजेत. सत्य कधीच सोडू नका. कारण सत्याचाच नेहमी विजय होत असतो. असे प्रतिपादन केले.
यावेळी कोळंब बचाव समितीचे रामा वेळीप, महेश गावकर, तसेच इतर समित्यांच्या सदस्यांनीही आपले विचार व्यक्त केले.
दरम्यान, सदर बैठक सुरू असताना ६ वा. अचानक सुकेकर्णा येथून तिंबलो मायनिंगचा एक ट्रक खनिज माल घेऊन रिवण भागातून जाण्याऐवजी कावरे भागातून येत होता. सदर ट्रक स्थानिकांनी अडवला. चालकाकडे असलेली रिसीट काढून घेतली. कोणत्या कंपनीचा माल आहे ते पाहिले. ट्रकात १०.६०० टन माल होता. सदर ट्रक परत मागे पाठवला. या भागातून कोणत्याही परिस्थितीत खनिज वाहतूक करू देणार नसल्याचे ठणकावून सांगितले.

नास्नोडा खूनप्रकरणातील पतीला ७ दिवसांची कोठडी
म्हापसा, दि. २७ (प्रतिनिधी): आपल्या पत्नीचा धारदार सुर्याने खून करणारा गणपत शेट्ये या संशयित पतीला न्यायालयात उभे केले असता त्याला सात दिवसांची कोठडी ठोठावण्यात आली.
काल (दि.२६) रात्री आठच्या सुमारास नास्नोडा भरणवाडा पाट्यावर गणपत याने आपली पत्नी स्नेहा हिचा सुर्याने सपासप वार करत खून केला होता. त्यानंतर गणपतने तेथून पोबारा केला. पोलिसांना या घटनेचे वृत्त कळताच पोलिसांनी त्वरित तेथे धाव घेतली. घटनास्थळी चाकू व मोबाईल व पर्स पोलिसांना आढळली. तसेच दूरवर पडलेला सँडलही आढळला. त्यावरून स्नेहा हिने आपला जीव वाचवण्यासाठी बरीच झटापट केल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला. पर्समधील पॅनकार्डामुळे पोलिसांनी तिची ओळख पटली.
दरम्यान रात्री उशिरा गणपत हा पेडणे पोलिसांना शरण आला. खून केल्यानंतर गणपत हा आपल्या भावाकडे म्हापसा येथे गेला होता व भावाने गणपतला पेडणे पोलिसात नेले होते. पोलिसांनी तेथे गणपतला अटक केली.
सदर शेट्ये दांपत्याला सात वर्षांची मुलगी व चार वर्षांचा मुलगा आहे. स्नेहा ही एका बिनसरकारी संस्थेत कामाला जात होती. दोघांचा आंतरजातीय प्रेमविवाह झाला होता. सासरची मंडळी स्नेहाला वेडेवाकडे बोलत असल्याने स्नेहा ही सासरी जाण्यास टाळाटाळ करत होती. तर संशयित गणपत हा तिला तिथेच रहायला जाऊया असा तगादा लावत होता. यावरून उभयतांमध्ये बराच वादविवाद होत असे. संशयित गणपत हा व्यसनी व बेकार असल्यामुळे त्याचा तसेच संसाराचा भार स्नेहा उचलत होती.
काल संध्याकाळी आपल्या स्कूटरने गणपत पावणेसहा वाजता स्नेहाला आणण्यास पणजी येथे आला होता. पणजीहून जाताना स्नेहासोबत पुन्हा घरी जाण्याचा विषय त्याने काढला. यावरून त्यांच्यात भांडण झाले. नास्नोडा भरणवाड्यावर स्कूटर थांबवून गणपत याने आपल्याकडील सुरा काढला व स्नेहावर सपासप वार केले.
या प्रकरणी पंचनामा करत शवचिकित्सा तपासणी करत स्नेहाचा मृतदेह माहेरच्या लोकांकडे सोपवण्यात आला. आज संध्याकाळी मयडे येथील स्मशानभूमीत स्नेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. संशयित पती गणपत याला सात दिवसांची कोठडी सुनावली आहे.

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक
अनेक विषयांवर चर्चेची शक्यता
पणजी, दि. २७ (प्रतिनिधी): राज्य मंत्रिमंडळाची उद्या बैठक होणार असून त्यात अनेक महत्त्वाचे विषय चर्चेला येण्याची शक्यता आहे. गत विधानसभा अधिवेशनानंतर ही पहिलीच बैठक होणार आहे. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी मुख्य सचिव संजय श्रीवास्तव यांच्या कार्यपद्धतीवर टीका करणारे पत्र मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना पाठवल्याने त्याचेही तीव्र पडसाद या बैठकीत उमटतील, अशी खात्रीलायक माहिती मिळाली आहे.
महाराष्ट्रातील तिलारी धरण प्रकल्पग्रस्तांनी १ मेपासून तिलारीचे पाणी अडवण्याचा इशारा दिला आहे. गोवा सरकारकडून तिलारी प्रकल्पाबाबतच्या सामंजस्य कराराची पूर्तता केली नसल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आहे. याविषयावर या बैठकीत चर्चा होणार आहे. रिव्हर प्रिन्सेस जहाज हटवण्याचे काम सुरू झाले असले तरी अद्याप अरीहंत शीप ब्रेकर्स कंपनीकडे करार करण्यात आला नाही तसेच या जहाजाचे भंगार त्यात कंपनीला देण्याचाही निर्णय राज्य आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाने घेतल्याने उद्याच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे कळते. खनिज वाहतूक तथा बेकायदा खाणींवरून विविध ठिकाणी स्थानिकांचा उठाव होत आहे. सरकारने खास खनिज रस्ते तयार करण्याची योजना आखली असून त्याची कार्यवाही सुरू करण्याबाबतही या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे.
अर्थसंकल्पातील विविध योजनांची कार्यवाही करण्यास सरकारने सुरुवात केली आहे. या योजनांवर विस्तृत चर्चा या बैठकीत करण्यात येणार असल्याचे कळते. शिक्षण हक्क कायद्याबाबत निर्माण झालेल्या परिस्थितीवरही या बैठकीत प्रकाश टाकला जाईल. केंद्रीय नियोजन मंडळाने गोव्यासाठी संमत केलेल्या अंदाजपत्रकाची माहिती मुख्यमंत्री दिगंबर कामत आपल्या सहकार्यांना देणार आहेत. सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात येणार्या कार्यक्रमांचाही आढावा या बैठकीत घेण्यात येणार आहे.

महासमाधीत विसावले सत्यसाई..
लाखो भाविकांची उपस्थिती
पुट्टपार्थी, दि. २७ : संपूर्ण मानवजातीला प्रेम आणि बंधुत्वाचा संदेश देणारे सत्यसाईबाबा यांच्या पार्थिवाला आज लाखो भाविकांच्या उपस्थितीत वेदमंत्रोच्चाराच्या जयघोषात महासमाधी देण्यात आली. तब्बल अर्ध्या शतकापासून लक्षावधी लोकांना अध्यात्माचा मार्ग दाखविणारे सत्यसाई अखेर नश्वर देहासह महासमाधीत लीन झाले. यावेळी त्यांच्या भाविकांना अश्रू आवरणे कठीण झाले होते.
८५ वर्षीय सत्यसाईबाबांच्या अंत्यसंस्कारासाठी लाखो भाविक पुट्टपार्थीत गोळा झाले होते. बाबांचे पुतणे आर. जे. रत्नाकर यांनी सर्व अंत्यसंस्कार पार पाडल्यानंतर प्रशांती निलायम आश्रमातच कुलवंत हॉलमध्ये बाबांनीच निर्धारित केलेल्या जागेवर त्यांना महासमाधी देण्यात आली. पूर्ण राजकीय सन्मानासह बाबांना अखेरचा निरोप देण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी, एम. व्यंकय्या नायडू, बंडारू दत्तात्रय, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन. किरण कुमार रेड्डी, कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येदीयुरप्पा, राज्यपाल ई. एस. एल. नरसिंहन, शिवराज पाटील, एन. चंद्राबाबू नायडू, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सकाळी पावणे दहा वाजताच्या सुमारास सर्व वैदिक पंडितांकडून अंत्यसंस्काराचे विधी पूर्ण झाल्यानंतर साईंच्या समाधीस्थळाभोवती भलामोठा लाल पडदा टाकण्यात आला. त्यानंतर पडद्याच्या आत साईंच्या समाधीसाठीची तयारी करण्यात आली. याच ठिकाणी साईबाबांनी गेल्या कित्येक दशकांपासून आपल्या भक्तांना मार्गदर्शन केले होते. तेथेच आज ते कायमचे विसावले आहेत. याच ठिकाणी बाबांचे मोठे स्मारक उभारले जाणार आहे. आगामी काळात हेच त्यांच्या भाविकांसाठी श्रद्धास्थान राहणार आहे.
जवळपास ४० मिनिटांनंतर तो पडदा उचलण्यात आला. त्या ठिकाणी लोकांना बाबांच्या समाधीला पाहता आले. पूर्णत: हिंदू पद्धतीप्रमाणे बाबांना समाधीस्थ करण्यात आले.
तत्पूर्वी, बाबांसाठी शुभ आकडा असलेल्या सकाळी ९ वाजता एका काचेच्या पेटीतून बाबांचे पार्थिव आणले गेले. त्यातून बाहेर काढत त्यांच्या पार्थिवाला तिरंग्यात काही वेळासाठी गुंडाळण्यात आले. आंध्रप्रदेश सशस्त्र पोलिस दलाच्या जवानांनी हवेत गोळीबार करीत बाबांना अखेरची मानवंदना दिली. नंतर तिरंगा काढण्यात आला. हिंदू, ख्रिश्चन, मुस्लिम, शीख, ज्यू आणि बौद्ध या धर्माच्या धर्मगुरूंनी आपापल्या धर्मातील मंत्रोच्चार आणि पवित्र कलमांचे पठन केले. बाबांच्या पार्थिवावर नऊ पवित्र नद्यांचे जल तसेच गोमूत्र शिंपडण्यात आले. विधी पार पडणार्या पुजार्यांना गोदान तसेच मध, तूप आणि रेशमाचे दान करण्यात आले. नंतर समाधीस्थळी महाआरती करण्यात आली. बाबांना नेहमीच भगव्या रंगाची कङ्गनी आवडत असे. त्याच रंगाच्या परिधानात बाबांना महासमाधी देण्यात आली.
या समाधी विधीनंतर अडवाणींसह सर्व ज्येष्ठ नेत्यांनी रत्नाकर यांची भेट घेत त्यांची सांत्वना केली आणि समाधीस्थळी पुष्प अर्पण केले. केवळ तेथे प्रत्यक्ष उपस्थित असणारेच नव्हे तर टीव्हीवरून याचे थेट प्रक्षेपण पाहणार्यांनाही आपले अश्रू आवरता आले नाहीत.

कॉंग्रेसला पदभ्रष्ट करण्यासाठी म. गो. पक्षाशी युती आवश्यक
पणजी, दि. २७ (किशोर नाईक गांवकर): सध्याच्या या आघाडीच्या युगात कोणत्याही राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणे कठीण आहे. अशाप्रसंगी समविचारी पक्षांशी जुळवून घेऊन पुढे जाणेच योग्य. गोव्यात भारतीय जनता पक्षाची विचारसरणी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाशी काही प्रमाणात मिळतीजुळती आहे. यापूर्वी या दोन्ही पक्षांची युती झालेली होती. गोव्यात कॉंग्रेसची भ्रष्ट राजवट उलथवून टाकायची असेल तर ही युती पुन्हा होणे गरजेचे आहे, असा स्पष्ट खुलासा उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांनी केला. सध्याचा म. गो पक्ष खरोखरच अजूनही गोव्याचे भाग्यविधाते स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या विचारसरणीनुसार वाटचाल करीत असेल तर ही युती निश्चितच फलद्रूप होईल यात तिळमात्र शंका नाही, असा विश्वासही श्रीपादभाऊ यांनी बोलून दाखवला.
भाजपचे केंद्रीय निवडणूक प्रभारी तथा लोकसभेचे उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी एका जाहीर कार्यक्रमांत म. गो पक्षाकडे युती करण्याबाबतचा प्रस्ताव बोलून दाखवला होता. पक्षाच्या केंद्रीय प्रभारी आरती मेहरा यांनीही या विषयाला दुजोरा देत त्यासंबंधी प्रयत्न सुरू असल्याचे म्हटले होते. भाजप नेत्यांच्या या वक्तव्यांनंतर राज्यात राजकीय पटलावर या संभाव्य युतीबाबत चर्चेचे गुर्हाळ उठले आहे. खासदार श्रीपाद नाईक यांनी या विषयावर बोलताना अधिक प्रकाश टाकला. गोव्यातील कॉंग्रेसरूपी भस्मासुराचा वध करणे हे भाजपचे प्रथम लक्ष्य आहे. हे साध्य करण्यासाठी समविचारी पक्षांची मदत घेणे अपरिहार्य आहे व त्यामुळेच म. गो.ची साथ घेण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. भाऊसाहेब बांदोडकर यांनी म. गो पक्षाची स्थापना करून सदोदित कॉंग्रेसच्या धोरणांविरोधात एकहाती लढा दिला. या पक्षाने १७ वर्षे राज्यही केले. गोव्याच्या विकासाचा खरा पाया हा भाऊसाहेबांनीच घातला हे कुणीही नाकारू शकणार नाही. ज्या कॉंग्रेस पक्षाविरोधात भाऊ लढले त्याच कॉंग्रेसबरोबर सत्तासोबत करण्याची कृती बहुतांश स्वाभिमानी म. गो कार्यकर्त्यांना रुचलेली नाही. विविध भागांतून म. गो कार्यकर्त्यांकडून मिळत असलेल्या प्रतिसादावरून त्यांना भाजप जवळचा वाटत असल्याचेच दिसून येते. अर्थात म. गो सत्तेत सामील असल्याने या प्रस्तावाबाबत तात्काळ निर्णय घेणे पक्षाला शक्य नाही याची जाणीव भाजपला आहे. या प्रस्तावाबाबत किमान संघटनात्मक पातळीवर निश्चितच चर्चा होऊ शकते व याच प्रतिसादाची वाट भाजप पाहत आहे. भाजपने म. गोशी युतीचा प्रस्ताव हा जनतेच्या दरबारात सादर केला आहे. जनतेकडूनही त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळे या युतीसंबंधी शेवटच्या क्षणापर्यंत भाजप प्रयत्न करेल, असेही श्रीपाद नाईक यांनी स्पष्ट केले. गोव्यातील अल्पसंख्याकांच्या मनातही कॉंग्रेसविरोधातील रोष आता प्रकट होऊ लागला आहे. कॉंग्रेसकडून केवळ मतांसाठी या लोकांचा वापर करून घेतला जातो हे आता त्यांना कळून चुकले आहे. काही नेते नवा प्रादेशिक पक्ष स्थापन करण्याची तयारी करीत असल्याने त्याकडेही भाजपचे लक्ष आहे. भाजपचा प्रभाव नसलेल्या काही मतदारसंघात कॉंग्रेसला विरोध करणार्या उमेदवारांना पाठिंबा देण्याबाबतही विचार केला जाईल. आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देताना भाजपकडून महिला, युवक, अल्पसंख्याक आदींचा गंभीरपणे विचार करेल, असेही श्रीपाद नाईक यांनी स्पष्ट केले.

Subscribe to:
Posts (Atom)