Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Wednesday 3 December, 2008

अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन

वॉशिंग्टन, दि.२ : अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी हिलरी क्लिंटन यांना परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्त केल्याची घोषणा केली आहे. सोबतच विद्यमान संरक्षणमंत्री रॉबर्ट गेट्स यांचे मंत्रालय कायम ठेवण्यात आल्याचेही सांगितले आहे.
शिकागो येथे ओबामा यांनी आपल्या नव्या मंत्रिमंडळाची घोषणा केली. ते म्हणाले की, हिलरी क्लिंटन या अमेरिकेच्या पहिल्या महिला नागरिक राहिल्या आहेत. त्यामुळे त्यांचा अनुभव जागतिक राजकारणाच्या दृष्टीने अमेरिकेला फायद्याचा ठरणार आहे. सध्या बुश यांच्या मंत्रिमंडळात असणाऱ्या रॉबर्ट गेट्स यांच्यावर विश्वास व्यक्त करीत ओबामा यांनी त्यांना आपल्या प्रशासनातही संरक्षणमंत्री म्हणून कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
याशिवाय एरिजोनाचे गव्हर्नर जॅनेट नॅपोलिटानो यांना गृहमंत्रालय, इरिक होल्डर अटर्नी जनरल, निवृत्त नौदल प्रमुख जेम्स जोन्स यांना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि प्रदीर्घ काळपर्यंत सल्लागार राहिलेल्या सुसान राईस यांना संयुक्त राष्ट्राचे राजदूत नियुक्त केले आहे. या चमूच्या मदतीने आपण अमेरिकेत नवे युग आणू, असा विश्वासही ओबामा यांनी व्यक्त केला.

No comments: