Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday 25 January, 2008

राष्ट्रवादीची मगो व विश्र्वजितसमवेत
समांतर आघाडी - पवार



पणजी, दि. २४ (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी कॉंग"ेस पक्ष गोव्यात मगो व अपक्ष आमदार विश्वजित राणे यांना बरोबर घेऊन समांतर आघाडी स्थापन करणार असून या आघाडीमार्फतच मु"यमंत्री दिगंबर कामत यांना पाठिंबा दिला जाणार असल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रवादी कॉंग"ेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आज केले.
राष्ट्रवादी कॉंग"ेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विल्फ"ेड डिसोझा यांनी आज एका पत्रकार परिषदेत अशा कोणत्याही आघाडीची शक्यता फेटाळून लावली होती व कामत सरकारला केवळ राष्ट्रवादीच्या तीन आमदारांचा पाठिंबाच पुरेसा असल्याचे म्हटले होते. प्रत्यक्षात दि"ीहून दूरध्वनीवरून येथील काही पत्रकारांशी बोलताना पवार यांनी याबाबत तातडीने खुलासा केला. विद्यमान कामत सरकार स्थिर व अधिक सक्षम राहण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले. तथापि पवार यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे गोव्यातील राजकीय पटलावरचे राजकारण अधिक रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. "सेव्ह गोवा फ"ंट" चे कॉंग"ेसमध्ये विलीनीकरण करून राष्ट्रवादी कॉंग"ेसचे महत्त्व कमी करण्याच्या कॉंग"ेसच्या डावाला श्री. पवार यांच्या या चालीमुळे जबरदस्त चपराक बसली आहे.
आरोग्यमंत्री विश्वजित राणे व मगोपचे अध्यक्ष पांडुरंग राऊत यांनी या नव्या आघाडीसंदर्भात केलेल्या वक्तव्याला डॉ. विली यांनी आज आक्षेप घेतला होता. कॉंग"ेस व राष्ट्रवादी यांची सं"या २१ बनल्याने सरकारला आणखी कोणाचीही गरज नाही, असा दावा करून विश्वजीत किंवा राऊत यांनी केलेल्या आघाडीबाबतच्या वृत्ताचा साफ इन्कार केला होता. मात्र डॉ. विली यांच्या या वक्तव्याची खबर दि"ीत पोहोचताच शरद पवार यांनी स्वतःच याप्रकरणी खुलासा करण्याचे ठरवले. मगोपचे अध्यक्ष पांडुरंग राऊत यांनी यासंबंधी थेट शरद पवार यांच्याशी संपर्क साधून विलींनी उधळलेल्या मुक्ताफळांची त्यांना कल्पना दिली. त्यावर अलीकडेच बंडखोर गटाबरोबर दि"ीत झालेल्या वाटाघाटीवेळी हा निर्णय झाल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. दि"ीत वरिष्ठ पातळीवर राष्ट्रवादीने हा धोरणात्मक निर्णय घेतल्याचे सांगून "कम्युनिकेशन गॅप" मुळे डॉ. विली यांना या निर्णयाची माहिती नसावी, असेही ते म्हणाले. मुळात विश्वजित राणे व मगोपच्या आमदारांबरोबर चर्चा झाल्यावेळी केंद्रीय विमानवाहतूकमंत्री प्रफु" पटेल हे उपस्थित होते, त्यांना तात्काळ विदेश दौऱ्यावर जावे लागल्याने त्यांना डॉ. विली यांच्याशी संपर्क साधणे कठीण बनले व त्याचमुळे ही परिस्थिती उद्भवली असा खुलासाही त्यांनी केला.
दरम्यान, विदेश दौऱ्यावर असलेले प्रफु" पटेल हे उद्या भारतात पोहोचत आहेत. परवा २६ प्रजासत्ताक दिवस असल्याने ते २७ रोजी गोव्यात येण्याची शक्यता राष्ट्रवादी नेत्यांनी बोलून दाखवली. कॉंग"ेस व राष्ट्रवादी कॉंग"ेसचे वरिष्ठ नेते व स्थानिक नेते एकत्र बसून दि"ीत झालेल्या फ्यार्मुल्याची अंमलबजावणी करणार असल्याने त्याचा फटका कुणाला बसतो किंवा कुणाला लाभ होतो, याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. मु"यमंत्री दिगंबर कामत व दोन्ही पक्षाचा लवाजमा गोव्यात आला असला तरी सध्या राजकीय पटलावर कमालीची अस्वस्थता असल्याने हा फॉर्म्युला नक्की कोणता, हे येत्या तीन ते चार दिवसांत स्पष्ट होणार असल्याचे काहींचे म्हणणे आहे. कॉंग"ेसला गोव्यात सत्ता टिकवायची असेल तर काही प्रमाणात तडजोड करावीच लागेल, असे सूचक संकेत राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी दिले आहेत. स्थानिक राष्ट्रवादी नेत्यांनीच सरकाराविरोधात बंड केल्याने राष्ट्रवादीने आता आपला दबाव गट निर्माण केला आहे. या नव्या फ्यार्मुल्यानुसार सुदिन ढवळीकर यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता बळावली आहे, त्यासाठी कॉंग"ेसमधील एकाला मंत्रीपदाचा त्याग करावा लागणार असल्याचे दिसते. खाते वाटपातही बदल होण्याचे स्पष्ट संकेत असून नार्वेकर यांच्याकडील वित्त खाते काढून घेतले जाण्याच्या निर्णयालाही सरकारातील काही घटकांनी दुजोरा दिला आहे.

No comments: