Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 25 July 2010

अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल; पोलिस प्रचंड दबावाखाली

सुनील कवठणकर यांच्यावर सध्या म्हापसा वृन्दावन इस्पितळात उपचार सुरू आहेत. हळदोण्याचे आमदार ऍड. दयानंद नार्वेकर हे वगळता पक्षाचा एकही नेता त्यांची विचारपूस करण्यासाठी तिथे फिरकला नाही, अशी माहिती प्राप्त झाली आहे. इस्पितळाच्या "रिसेप्शनवर' आलेले पोलिस त्यांची विचारपूस न करताच गेले, असेही कळते. सुनील यांच्या चेहऱ्यालाच गंभीर जखम झाल्याने व त्यांचे दात तुटल्याने त्यांना बोलताही येत नाही, अशा स्थितीत त्यांची जबानी नोंदवणे शक्य नसल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. दरम्यान, म्हापसा पोलिस स्थानकाशी संपर्क साधला असता भारतीय दंड संहितेच्या ३३६, ३३८, ४२७ (३४) या कलमांखाली अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नसून तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सोमवार २६ रोजी या प्रकरणाचे तीव्र पडसाद विधानसभेत उमटण्याची शक्यता असल्याने पोलिसांवर प्रचंड दबाव आला आहे.

No comments: