बगदाद, दि. १८ - पश्चिम बगदादमधील एका लष्करी कार्यालयात आज झालेल्या आत्मघाती हल्ल्यात कमीत कमी ४३ लोक ठार झाले असल्याचे इराकच्या संरक्षण तसेच गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे.
अल कायदाविरोधात लढणारे लोक या कार्यालयात पगार घेण्यासाठी आले असता हा आत्मघाती स्फोट करण्यात आला. यासंदर्भात अधिक माहिती देताना इराकच्या गृहमंत्रालयाने सांगितले की, हा आत्मघाती अतिरेकी अल बलासीम येथे आला व तेथील लष्करी कार्यालयाजवळ उडवून घेतले. कधी काळी हा भाग अतिरेक्यांचा बालेकिल्ला होता. या स्फोटात ठार झालेले बहुतांश लोक हे सहवा लढवय्ये तसेच सुन्नी अरब या संघटनेचे सदस्य होते. इराकचे पुत्र म्हणूनही ते ओळखले जातात. यांना अमेरिकेचे सर्व प्रकारचे पाठबळ असून २००६ पासून या संघटनेने अल कायदाच्या विरोधात सशस्त्र लढा उभारलेला आहे.
Monday, 19 July 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment