Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Tuesday, 7 September 2010

देशव्यापी "बंद'निमित्त आज कामगार मोर्चा

-बसवाहतूक सुरू राहणार
-"बंद'मोडण्यासाठी 'एस्मा'


पणजी, दि. ६ (प्रतिनिधी) - केंद्रातील "युपीए' सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे उद्या देशव्यापी बंदचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र संप मोडून काढण्यासाठी राज्य सरकारने एस्मा कायदा लावला आहे. वीज खात्याचे कर्मचारी, तसेच अन्य सरकारी कर्मचारी, त्याचप्रमाणे, नदी परिवहन कर्मचाऱ्यांनाही हा कायदा लागून होत असल्याने त्यांनी या संपात सहभागी होऊ नये, असे सरकारने बजावले आहे. या संपात खाजगी बसमालक संघटना सहभागी होणार नसल्याने बस वाहतूक सुरू राहणार असल्याचे गोवा खाजगी मालक संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर यांनी सांगितले.
देशातील डाव्या कामगार संघटनेने पुकारलेल्या या बंदनुसार उद्या सकाळी ९ वाजता सर्व पणजी येथील कामगार क्रांती चौकाजवळ जमा होणार आहेत. नंतर पणजी कदंब बसस्थानकावरून विराट रॅली शहरात काढली जाईल, मग या रॅलीचे रूपांतर आझाद मैदानावर जाहीर सभेत आयोजन करण्यात आले आहे. सुमारे १० हजार कामगार या यावेळी काढण्यात येणाऱ्या रॅलीत सहभागी होणार असल्याचा दावा कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी केला आहे. या संपात बॅंकांही सहभागी होणार आहेत. म्हापसा अर्बन सहकारी बॅंकेच्या कामगारांना दहा वर्षे पगारवाढ मिळालेली नाही व त्यामुळे हे बॅंक कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत.

No comments: