मडगाव, दि. ४ (प्रतिनिधी) : वजन व माप खात्याच्या अधिकाऱ्यांनी खारेबांध येथील मीरा सहकारी सोसायटीच्या इमारतीतील एका फ्लॅटवर आज दुपारी छापा घालून विना परवाना चिनी बनावटीचे ७५ मोबाईल त्यांनी जप्त केले. बाजारात त्यांची किंमत २ लाख रुपयांपेक्षा जास्त असून दुकान मालक मुकेशकुमार खेत्री फरारी झाला आहे.
काळ्या बाजारातून चिनी बनावटीच्या वस्तू आणून तो गोव्यातील बाजारात त्यांचा पुरवठा करीत होता. मात्र या वस्तू कुठून येतात याचा पत्ता लागत नव्हता. त्याच वेळी अशा वस्तूंची विक्री खारेबांध येथे सुरू असल्याचा सुगावा वजन व माप खात्याला लागला. खात्याचे नियंत्रक श्री. नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली अरुण पंचवाडकर व गुलाम गुलबर्ग यांनी दुपारी त्या फ्लॅटवर छापा घालून सर्व माल जप्त केला.
मडगाव बाजारात कित्येक ठिकाणी अशी दुकाने थाटलेली असून सदर वस्तूंवर कोणतीच किंमत लावलेली नसते. त्यामुळे सरकारला लाखो रुपयाच्या महसुलावर पाणी सोडावे लागत आहे. वजन व माप खात्याने त्यांची तात्काळ आणि सखोल चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.
Sunday, 5 September 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment