Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 5 September 2010

मडगावात बारबाला व दोघा एजंटना अटक, हॉटेलचा व्यवस्थापक फरारी

सेक्स रॅकेटचा पुन्हा सुळसुळाट

मडगाव, दि. ४ (प्रतिनिधी) : पेडणे, कळंगुटपाठोपाठ मडगाव येथे पुन्हा सेक्स रॅकेट डोके वर काढत आहे. पाच वर्षांपूर्वी कोलवा, फातोर्डा येथे अशाच रॅकेट अड्ड्यांवर छापे घालून कित्येक बारबालांना अटक करण्यात आली होती. काल रात्री मडगाव पोलिसांनी खारेबांध येथील सिझर हॉटेलवर छापा टाकून दोन बारबालांसह दोघा एजंटना अटक केली. या बारबाला मुंबईतील असून त्यांची रवानगी "अपनाघर'मध्ये करण्यात आली आहे.
या सिझर हॉटेलात मुंबईचा नेव्हिल डिसोझा व पर्रा म्हापसा येथील चरण गंगाधर खर्वे हे गोव्यात विविध हॉटेलात तरुणीचा पुरवठा करत होते. काल या दोघांना मडगाव पोलिसांनी अटक केली. पोलिस निरीक्षक संतोष देसाई, उपनिरीक्षक तुळशीदास नाईक, सुभाष नाईक, रोहन नाईक व चंद्रू वेळीप यांनी ही कारवाई केली. गेल्या आठ दिवसांपासून या हॉटेलात हा धंदा मोठ्या प्रमाणात चालत होता. या प्रकरणी हॉटेलचे व्यवस्थापक लॅस्टेर डिसोझा याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला असून तो फरारी आहे. त्याला लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.
मडगाव परिसरात केवळखारेबांधच नव्हे तर गांधी मार्केट, रावणफोंड, फातोर्डा, कोलवा भागात राजरोस असे व्यवसाय सुरू आहेत. गेल्या वर्षी फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमजवळ एका फ्लॅटमध्ये छापा घालून कित्येकांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर शिर्ली येथील अड्ड्यावर छापा घालून ६ जणांना अटक करण्यात आली होती. मायणा कुडतरी पोलिसांनी रायचे तळे कुडतरी येथील एका फार्म हाऊसवर छापा घालून कित्येक बारबालांना अटक केले होती. या फार्म हाऊसवर गोव्यातील प्रतिष्ठित मंडळी जात असल्याचे दिसून आले होते. कोलवा प्रकरण तर पोलिसांच्या अंगलट आले होते. पोलिसांनी खारेबांध येथे छापा घातला असला तरी या व्यवसायाची व्याप्ती प्रचंड असून
असून मुंबई व गोव्यातील तरुणी या रॅकेटमध्ये गुंतल्या असल्याचा अहवाल पोलिसांना मिळाला आहे. पोलिसांसाठी बीट पद्धती असताना या व्यवसायाचा तपास लावण्यात उशीर लागल्याबद्दल लोकांतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

No comments: