Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Friday, 10 September 2010

मिकींच्या कार्यालयावर आयकर खात्याचे छापे

लॅपटॉप व कागदपत्रे जप्त

पणजी, दि. ९ (प्रतिनिधी) - फसवणूक आणि लुबाडणूक प्रकरणात गुंतलेल्या माजी पर्यटन मंत्री मिकी पाशेको यांच्या कार्यालयावर केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाचा छापा सुरू असतानाच, आज आयकर विभागाने छापा टाकून एक लॅपटॉप आणि अन्य काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त केल्याची माहिती मिळाली आहे. यावेळी मिकी पाशेको स्वतः त्याठिकाणी उपस्थित होते. तर, छापा सुरू असताना कार्यालयाबाहेर मिकीच्या समर्थकांनी प्रचंड गर्दी केली होती. मात्र कोणतीही अनुचित घटना घडली नाही.
दरम्यान, मिकी यांची पूर्वीची बायको सारा पाशेको हिने मिकी आपली बनावट सही करून लोकांना विदेशात पाठवत होता, असा आरोप केला आहे. त्याचप्रमाणे, तरुणांना विदेशात पाठवण्याच्या कोणत्याही घटनेशी आपला संबंध नसल्याचे तिने स्पष्ट केले आहे. २००० सालापासून मिकी यांच्या एजन्सीपासून संबंध तोडले होते. ज्यावेळी माझ्या सहीची नक्कल करून बनावट कागदपत्रे बनवली जात असल्याचे लक्षात येताच आपण त्या एजन्सीपासून संबंध तोडले होते, असे सारा हिने स्पष्ट केले आहे.
"मॅनपावर मॅनेजमेंट एजन्सी' साठी १९९८ साली परवाना मिळवण्यात आला होता. त्यानंतर दोन वर्षे आम्ही एकत्रित ही एजन्सी चालवली. परंतु, ज्यावेळी काही तरुणांना त्याने माझी बनावट सही करून विदेशात पाठवल्याचे लक्षात आले तेव्हाच ही या एजन्सीपासून दूर झाले'' असे सारा म्हणाली.
बनावट कागदपत्रांद्वारे विदेशात आलेल्या गोव्यातील काही तरुणांना अमेरिकेत अटक केल्यानंतर मिकी पाशेको याचे नावे पुढे आले होते. त्यानंतर मिकी हे एका रॉकेटचा भाग असल्याचा दावा करून केंद्र सरकारला याची माहिती देण्यात आली होती. "मी हा व्यवसाय सारा हिच्या मदतीने करीत होतो. मात्र २००३ पासून मी त्यातून बाहेर निघालो. ती अजुनीही ही एजन्सी चालवते काही नाही, हे आपल्याला माहिती नाही' असे मिकी पाशेको यांनी आपली बाजू मांडताना सांगितले. आहे. २००३ मध्येच मिकी पाशेको यांनी आपल्याला घरातून हाकलून लावले होते, असे सारा हिचे म्हणणे आहे.

No comments: