Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 8 August 2010

मालिकेत "फिट्टंफाट'

शतकवीर लक्ष्मण अविस्मरणीय विजयाचा शिल्पकार

कोलंबो, दि. ७ - हैदराबादी चिकनइतक्याच प्रसिद्ध असलेल्या "व्हेरी व्हेरी स्पेशल' लक्ष्मणने अप्रतिम शतक झळकावत भारताला लंकेविरुद्ध तिसऱ्या तथा अंतिम कसोटीत शानदार विजय मिळवून दिला आणि या दिमाखदार विजयाबरोबरच आज पाहुण्या भारताने यजमान श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. कसोटीच्या जागतिक मानांकनात पहिल्या स्थानावर असलेल्या भारताने धावांचा पाठलागही आपण लिलया करू शकतो हेही सिद्ध केले. त्यामुळे क्रिकेटप्रेमींना ही विजयश्री भलतीच सुखावून गेली.
नाईट वॉचमन ईशांत शर्मा दिवसातील केवळ दुसऱ्याच षटकात बाद झाल्यावर भारतावरील दडपण वाढले. मात्र मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि लक्ष्मण यांनी आपला अनुभव पणाला लावत विजयाची पायाभरणी केली. सचिन आणि लक्ष्मण यांनी चौथ्या विकेटसाठी केलेली १०९ धावांच्या भागीदारीने सामन्याचा नूरच पालटवला. भारताला तेव्हाच विजयाचा सुगंध येऊ लागला होता.
वैयक्तिक ५४ धावांवर सचिन बाद झाला तेव्हा श्रीलंका सामन्यात पुन्हा उसळी घेईल, अशी चिन्हे दिसू लागली होती. तथापि, लक्ष्मण विजयाच्या इराद्याने जणू पेटला होता. त्याने अष्टपैलू सुरेश रैनाच्या साथीत भारताला अविस्मरणीय विजय मिळवून दिला. विशेष म्हणजे दुखापत होऊनही तो डगमगला नाही. त्याने रनर म्हणून वीरेंद्र सेहवागला साथीला घेतले आणि डझनभर कलात्मक चौकारांची आतषबाजी करत आपल्या कारकिर्दीतील १६ वे कसोटी शतक झळकावले. रैनाने नाबाद ४१ धावा चोपल्या त्या चार चौकार अन् एका उत्तुंग षटकारानिशी.
लक्ष्मणला या पठ्ठ्याने तोलामोलाची साथ दिली. श्रीलंकेच्या वतीने सूरज रणदीवने पाच गडी बाद मटकावले. २५७ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारताची अवस्था काल दिवसअखेर ३ बाद ५३ अशी केविलवाणी झाली होती. त्यामुळे उपाहारादरम्यान भारतीय संघाचा "बाप्पा मोरया..' होणार, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र आज संयम आणि कौशल्य यांचा मनोहारी संगम साधून भारताने मालिकेत सन्मानपूर्वक बरोबरी साधली. आता भारताला वेध लागले आहेत ते झटपट तिरंगी स्पर्धेचे. यजमान श्रीलंकेखेरीज न्यूझीलंड हा या स्पर्धेतील तिसरा संघ असून येत्या १२ तारखेपासून सदर स्पर्धेचा शुभारंभ होईल.

लक्ष्मणा धाव.. धाव...
"साला काय खेळला लक्ष्मण', भारताच्या शानदार विजयावरील ही प्रातिनिधिक प्रतिक्रिया. हा "लक्ष्या' म्हणजे जणू पहाडच. श्रीलंकेच्या सगळ्याच योजनांवर या शूर सरदाराने पाणी फेरले. त्याचे हे मखमली शतक ज्यांनी पाहिले ते क्रिकेटरसिक खरोखरच सुदैवी म्हटले पाहिजेत. कारण असे दुर्मीळ योग वारंवार येत नसतात. तमाम भारतीय क्रिकेटरसिकांनी लक्ष्मणा धाव.. धाव... अशी साद घालताच या हैदराबादी पठ्ठ्याने नाबाद शतकच ठोकले. तमाम भारतीयांबरोबरच गोवेकरांनीही त्याच्या या अफलातून खेळीला मनोमन सलाम केला. गोव्यातील घराघरात काल चर्चा रंगली होती ती व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मणच्या याच लज्जतदार खेळीची.

1 comment:

Anonymous said...

Saala RAVI NAIK aur uska LAVDA ROY NAIK kya drugs bechate be! Saalo bap bete ne bahut rokda kamaaya be. Kya bolta be, govadoot, sach ki nahi bhai?