महाराजांनी स्वत:ला करवून घेतलेल्या वैदिक पद्धतीच्या राज्यभिषेकाची नोंद अर्धवट जेम्सलाही करावी लागते. त्यामागे त्याची अखिल भारतात स्वत:चे हिन्दूराज्य असल्याची भावना निर्माण करण्याचा दृष्टीकोन लेन नोंदवतो. The Ceremony which had fallen out of use in Islamicate india, was seen as a revival of royal Hindu traditions. In other words, there is clear evidence that at the end of his career Shivaji began to think in new ways about his exercise of military and political power, ways that drew up on ancient symbols of Hindu kingship (पृ३०)
महाराजांच्या पराक्रमाने चारित्र्याने दूरदर्शित्वाने भारले जाऊन अनेक विद्वान आणि कर्तबगार लोक त्यांच्या आश्रयाला आले, त्यात कविराज भूषणाचा जसा समावेश होता तसाच त्यावेळी तरूण असलेल्या छत्रसाल बुंदेला हाही होता. महाराजांनी छत्रसालाला स्वत:च्या नौकरीत घेतले नाही तर बुंदेलखंडात मोगलांशी संघर्ष करून स्वत:चे राज्य-स्वराज्य निर्माण करण्यास प्रेरणा दिली आणि छत्रसालाने त्याचे राज्य स्थापन करून महाराजांची इच्छा पूर्ण केली.
थेट आसामात लाछित बडफुकन यालाही त्या राज्यभिषेकाने प्रेरणा मिळाली. त्यानेही इंग्रजीसत्तेविरूद्ध रणशिंग उभारले.
महाराजांचे आदर्शवत वर्णन खुद्द समर्थ रामदासांनी केले आहे. त्यांची रचना निश्चयाचा महामेरू। ... ही तेव्हा जशी वस्तुस्थितीचे वर्णन करणारी होती तशीच. ती आजही आहे.
लेनच्या मनातील गोंधळ की तर्कदृष्टपणा
लेनने पृ. ३७ ते ४४ मध्ये हिन्दू-मुस्लिम संबंधावर लिहिले आहे. त्याला या दोन्ही समाजांचा आपापसातील व्यवहार अनाकलनीय वाटतो. एकाच वेळी मुस्लिम राज्यकर्त्यांची चाकरी आणि त्याचबरोबर परंपरागत हिन्दू वर्तन यांचा त्याला मेळ घालता येत नाही किंवा जाणून-बुजून ती तर्कदृष्टता आहे?
भवानी मातेच्या भक्ताचा पाडाव करण्यास निघण्यापूर्वी मिर्झाराजा जयसिंग शतचंडी यज्ञ करतो. त्याला कट्टर मुस्मिल समजला जाणारा औरंगजेब प्रतिवंध करू शकत नाही. यात हिन्दूच्या चिवट धार्मिक मनोवृत्तीचा आणि एका दृष्टिकोनातून मुस्लिम संस्कृतीवर विजय मिळविण्याचा पुरावा मिळतो. ज्या इतर देशात ख्रिश्चन व इस्लाम धर्म गेले तिथे पूर्वापास्वी संस्कृती नष्ट झाली. भारत हाच एक असा देश आहे की जेथे मुस्लिम आणि ख्रिश्चन आक्रमणाला हिन्दू पुरून उरले, आपले सांख्यिक प्राबल्य त्यांनी टिकवून धरले. मुळात हेच जेम्स लेनला दुर्लक्षित करायचे असल्याने त्याचा पुस्तकाच्या शीर्षकापासूनच ते प्रतिबिंबित होते. तो शिवाजी महाराजांना The Hindu king of Islamic India म्हणतो. हे भारतवर्ष इस्लामिक केव्हा झाले? केवळ मूठभर परकीय राज्यकर्ते हिन्दूच्याच नादानीमुळे जेव्हा इथल्या विशाल हिन्दू जनसमुहावर अधिपत्य गाजवतात त्याचा अर्थ ते मुस्लिम राज्य Islamic होत नाही. तसेच दीडशे वर्षांच्या ख्रिश्चन धर्मीय ब्रिटीशांच्या राज्यानंतर किंवा गोव्यात पोर्तुगिजांच्या साडेचारशे वर्षाच्या दमननीती नंतरही आपली बहुसंख्य ठेऊन असलेले हिन्दू Christian State चे दुय्यम नागरिक बनत नाहीत. अनेक पाश्चात्य इतिहासकारांनी स्विकारलेले हा विकृत दृष्टीकोन जेम्स लेनच्या लिखाणातही दिसतो. तो चुकीचा, अर्धवट माहितीवर आधारलेला आणि दिशाभूल करणारा आहे. त्याची अशी शहानिशा व्हायला पाहिजे. भारतीय इतिहासाचे विकृतीकरण करण्याचा एक वस्तुपाठ म्हणून लेनचे पुस्तक अभ्यासण्यात यावे.
एक गोष्ट ठळकपणे लक्षात येते की, इतरांना आदर्शवत ठरलेला महानायक जेम्स लेनला उमजलाच नाही. (क्रमशः)
Sunday, 8 August 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment