पणजी, दि. २० (प्रतिनिधी) - पेडणे पोलिसांवर ड्रग व्यावसायिकांकडून हप्ते गोळा करण्याचा आरोप करून दक्षता खात्याकडे दाखल झालेल्या तक्रारी दक्षता खात्याच्या सचिवांकडे पाठवण्यात आल्या असून पुढील चौकशीसाठी त्या पोलिस महासंचालकांकडे सोपवण्यात येतील, अशी माहिती दक्षता खात्याचे संचालक अरुण देसाई यांनी दिली.
पेडणे पोलिस स्थानकाचे निरीक्षक उत्तम राऊत देसाई तसेच अन्य एक उपनिरीक्षक व दोन शिपाई हे हरमल येथे ड्रग व्यावसायिकांना संरक्षण देऊन त्यांच्याकडून हप्ते गोळा करतात, असा आरोप या लेखी तक्रारीत करण्यात आला आहे. एक स्थानिक व एका परप्रांतीयाने यासंबंधी दोन वेगवेगळ्या तक्रारी दाखल केल्या आहेत.
नुकतेच पोलिस आणि ड्रग धंद्यातील दलाल यांचे संबंध असल्याचे उघड झाल्याने या तक्रारींना महत्त्व प्राप्त झाले आहे. कळंगुट ते पेडणे हरमलपर्यंत या ड्रग दलालांचे जाळे पसरले आहे. काही दिवसांपूर्वी "सनी' नामक या ड्रग दलालाचा खून झाला होता. तो विदेशी नागरिकांना ड्रग पार्टी असलेल्या ठिकाणी घेऊन जाण्याचे काम करीत असे, अशी माहिती खुद्द पेडणे पोलिसांनीच उघड केली होती. त्यामुळे "सनी' याचा खून याच व्यवसायातून झाल्याचे नाकारता येत नाही.
Monday, 21 June 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment