पणजी, दि. २४ (प्रतिनिधी): राज्य मंत्रिमंडळाची बैठक उद्या २५ रोजी संध्याकाळी बोलावण्यात आली आहे. शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात व आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या कॉंग्रेस प्रवेशानंतर तसेच नीळकंठ हळर्णकर यांची पर्यटनमंत्रिपदी वर्णी लागल्यानंतर ही बैठक होणार आहे. उद्याच्या बैठकीत कृषी खात्यातर्फे राबवण्यात येणाऱ्या कंत्राटी शेती पद्धतीबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
पुढील महिन्यात विधानसभा अधिवेशन सुरू होणार असल्याने त्यासंदर्भात चर्चा या बैठकीत होईल, अशी अपेक्षा आहे. अनेक मंत्री विदेश दौऱ्यावर व गोव्याबाहेर असल्याने उद्याच्या बैठकीला नेमके कोणते मंत्री हजर असतील हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी अलीकडेच विविध विनाअनुदानित विद्यालयांना प्रवेश शुल्क कमी करण्याचे जे आदेश दिले आहेत त्या संबंधीच्या निर्णयाला उद्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळण्याचीही अपेक्षा आहे.
Friday, 25 June 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment