पणजी, दि. २४ (प्रतिनिधी): नादिया मृत्युप्रकरणी पोलिसांना हवे असलेले माजी मंत्री मिकी पाशेको उद्या गुन्हा अन्वेषण विभागाला शरण येण्याची शक्यता आहे.
या माहितीला त्याचे वकील अमित पालयेकर यांनी दुजोरा दिला आहे.
आज सकाळी मिकी दोना पावला येथे गुन्हा अन्वेषण विभागात शरण येणार असल्याची अफवा पसरवल्याने या ठिकाणी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच त्यांच्याबरोबर त्यांचे समर्थक येणार असल्याची माहिती परतवण्यात आली होती. उद्या पोलिसांना शरण यायचे की सर्वोच्च न्यायालयात दाद मागायची यावर ठोस निर्णय घेतला जाणार असल्याचे मिकी यांच्या जवळील सूत्राने सांगितले.
"सीआयडी'ने चौकशीला बोलावले असता पहिल्या दिवशी मिकी यांची आठ तास चौकशी करण्यात आली होती. यात आपण अडचणीत येत असल्याची शंका येताच दुसऱ्या दिवशी राजीनामा देऊन मिकी भूमिगत झाले होते. त्यानंतर सत्र न्यायालयाने व मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने मिकी तसेच त्यांचे "ओएसडी' लिंडन मोंतेरो या दोघांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावले होते.
Friday, 25 June 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment