Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Thursday, 11 September 2008

अतिमहनीय नेत्यांच्या वेतनात तिपटीने वाढ

नवी दिल्ली, दि.११ : देशाचे प्रथम नागरिक असणाऱ्या राष्ट्रपती तसेच उपराष्ट्रपती आणि राज्यपालांच्या वेतनात तिपटीने वाढ करण्याच्या शिफारशीला आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
राष्ट्रपतींना सध्या दरमहा ५० हजार रुपये इतके वेतन मिळत आहे. आता त्यांना दीड लाख रुपये महिन्याकाठी मिळणार असून उपराष्ट्रपती आणि राज्यपाल यांचे वेतन अनुक्रमे सव्वा लाख आणि एक लाख दहा हजार इतके झाले आहे. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यात याला मंजुरी देण्यात आली. उपरोक्त वेतनातील वाढ जानेवारी २००७ पासून लागू केली जाणार आहे.

No comments: