मडगाव, दि.१२ (प्रतिनिधी): वास्कोत बनावट नोटांचे घबाड सापडल्याची घटना ताजी असतानाच आज मडगावातही पाच हजारांच्या बनावट नोटा पोलिसांनी जप्त करून माल्डा (पश्चिम बंगाल) येथील एकाला अटक केली. त्याचा दुसरा साथीदार पळाला असून पोलिस त्याच्या मागावर आहेत.
वास्कोत सापडलेल्या बनावट नोटातही माल्डा येथील लोकच गुंतलेले असल्याने हे सारे एकाच टोळीचे काम असावे, असा पोलिसांचा कयास आहे. आज जप्त केलेल्या नोटांत ५०० रु. ची एक तर बाकीच्या ५० रु.च्या आहेत. त्यांची संख्या ७३ आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव अजय मूरमूर (३८) असे असून तो प. बंगालमधील माल्डा विभागातील आहे. कोलमोरड -नावेली येथे एका बांधकामावरील ठेकेदाराकडे तो कामावर आहे. तेथील एका मिनी बारमध्ये हे मजूर ५० रु.च्या नोटांची बंडले घेऊन फिरतात हे पाहून कोणीतरी पोलिसांना कळविले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी आपल्या सहकाऱ्याला पकडल्याचे पाहून त्याचा साथीदार मात्र पळाला.
वास्को पाठोपाठ मडगावात बनावट नोटांचे प्रकरण उघडकीस आल्याने पोलिस आता सतर्क झाले आहेत. पाकिस्तानमधून बांगला देशमार्गे हे बनावट चलन प. बंगालात येथे व तेथून ते अन्यत्र पाठविले जाते, असा कयास पोलिस व्यक्त करीत आहे.
Saturday, 13 September 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment