माशेल, दि. ९(प्रतिनिधी): कुंभारजुवे येथील पारंपरिक सांगोड उत्सव आज साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित केलेल्या पौराणिक सांगोड देखावा स्पर्धेतील प्रथम पारितोषिक लंकाधिशाचे स्वर्ग अभियान(पॅट्रीक ग्रुप),द्वितीय हिरण्यकशिपूची स्वर्गावर स्वारी(शांतादुर्गा युवा संघ), तृतीय गजमुखी गणराज(गणेश फुडस), तर उत्तेजनार्थ बक्षिसे संत गोरा कुंभार(सरस्वती कला मंडळ) व स्वर्गलोक(यंग स्टार) या देखाव्यांना देण्यात आली.स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रवीण नाईक व कन्हैया नाईक यांनी काम पाहिले.
श्रीशांतादुर्गा कुंभारजुवेकरीण देवस्थानात सात दिवसांचा श्रीगणेशोत्सव साजरा केला जातो. तारीवाडा-माशेल येथे विसर्जनासाठी श्रीची मूर्ती आल्यावर कुंभारजुवे येथील श्रीराम देवस्थानचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी सजविलेल्या होडीच्या सांगडातून नेली जाते. आज हा उत्सव पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
Tuesday, 9 September 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment