कोलकाता, दि. ८ : सिंगूर प्रकरणी रविवारी निघालेल्या तोडग्यात बरीच अस्पष्टता आहे. त्यामुळे कंपनीतील काम सध्यातरी बंदच ठेवण्याचा निर्णय आज टाटा व्यवस्थापनातर्फे घेण्यात आला.
गेले काही दिवस सिंगूरमधील टाटांच्या नॅनो प्रकल्पाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनावर रविवारी तोडगा निघाला. तरीही सोमवारी सकाळी कंपनीत काम करणारा कोणताही कर्मचारी किंवा कंत्राटदार कामावर परतलेला नव्हता. त्यामुळे तोडग्यानंतरही आज कंपनीत शुकशुकाटच होता. दरम्यान, दुर्गापूर द्रुतगती मार्गावरील वाहतूक सोमवारी सकाळी पूर्ववत झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांची ये-जा सुरू होती. पश्चिम बंगालचे राज्यपाल गोपालकृष्ण गांधी यांच्या पुढाकाराने चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर रविवारी जमिनीच्या बदल्यात जमीन या मुद्यावर या प्रकल्पाबाबत तोडगा निघाला.
Monday, 8 September 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment