Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 7 September 2008

चोडण येथे साई मंदिरातील मूर्तीची पुन्हा मोडतोड

पणजी, दि. ७ (प्रतिनिधी) - चोडण येथील साई मंदिरातील मूर्तीची नासधूस करण्याची पुन्हा एखादा घटना घडली आहे. लोक चतुर्थी उत्सवाच्या घाईगडबडीत असताना अज्ञातांनी हे कृत्य करून तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. दि. २६ जुलै रोजी याच श्रीसाई मूर्तीचे मुकुट फोडण्यात आला होता. यावेळी पूर्ण चेहराच उडवल्याने भक्तांनी संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी मागच्या तक्रारीवर कोणताही कारवाई केली नसल्याने या घटनेची पुन्हा तक्रार करण्यात आली नसल्याचे तेथील पुजाऱ्याने सांगितले.
तसेच यापूर्वी मंदिरातील मूर्तीवरील मुकुटही चोरीला जाण्याची घटना घडलेली आहे. अज्ञातांनी काल रात्री मंदिरात प्रवेश करून मूर्तीची तसेच ट्यूब व बल्ब फोडून टाकले. तसेच मंदिरात सिगरेटचे पाकिटेही सापडले आहे, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
दोन वर्षांपासून गोव्यात मूर्तींची मोडतोड करण्याचे सत्र अद्याप सुरू असून या प्रकरणात मात्र एकालाही अटक करण्याचे यश पोलिसांना आले नाही. परंतु, या घटना पोलिस खात्याने गांभीर्याने घेतल्याचे सांगण्यात येत आहे. तर, मंदिर सुरक्षा समितीने या विषयात ठोस पावले उचलण्याचे ठरवले आहे.

No comments: