पणजी, दि. १० : भारतीय जनता पक्षाने काल जाहीर केल्याप्रमाणे आज (बुधवारी) बिहार पूरग्रस्तांसाठी निधी संकलनास सुरुवात केली. आज पहिल्याच दिवशी दीडशे साड्या, शर्ट, चादरी अशा वस्तू लोकांनी कार्यालयात आणून दिल्या. विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी आपले महिन्याचे वेतन ४५,५०० रु. तसेच अध्यक्ष श्रीपाद नाईक यांनी २६,५०० रुपये दिले. अन्य हितचिंतकांनी दिलेली मदत मिळून चार लाख रुपयांवर निधी गोळा करण्यात आला.
निधी गोळा करण्यासाठी पक्षाचे सरचिटणीस गोविंद पर्वतकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती निवडण्यात आली. त्यात दयानंद सोपटे व विनय तेंडुलकर हे जिल्हाध्यक्ष, सदानंद तानावडे, सिद्धार्थ कुंकळकर व रुपेश महात्मे यांची समिती निवडण्यात आली.
उद्यापासून सर्व मतदारसंघात कार्यकर्ते निधी गोळा करण्यासाठी फिरणार आहेत, त्यांना जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन श्रीपाद नाईक व मनोहर पर्रीकर यांनी केले आहे. एसबी-०१--२४००२ या क्रमांकावर कॉर्पोरेशन बॅंकेच्या कोणत्याही शाखेतील खात्यात जमा करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ज्यांना आयकरात सुट हवी असेल, त्यांनी पर्वतकर यांच्याशी संपर्क साधावा, असे पत्रकात म्हटले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment