मडगाव, दि. १० (प्रतिनिधी): वजन व माप खात्याच्या येथील अधिकाऱ्यांनी आज मडगावात दोन ठिकाणी छापे घालन २३५ रिलायन्स बिग टीव्ही जप्त केले. कमाल किरकोळ किंमत व उत्पादन तारखेचा उल्लेख नसणे तसेच व्हॅट न भरणे या कारणांखाली ही कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
मडगाव प्रमाणेच वास्को येथेही काल दोन ठिकाणी अशीच कारवाई करण्यात आली. तथापि तेथे असे किती नग जप्त झाले हे कळू शकले नाही. मडगावात विनवेल कॉर्पोरेशन व दामोदर इलेक्ट्रिकल्स यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. त्यामुळे सरकारला मोठ्या प्रमाणात महसूलाला मुकावे लागल्याचे सांगण्यात येते.
वजन व माप खात्याचे संचालक किरण कोसंबे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अरुण पंचवाडकर व प्रसाद शिरोडकर यांनी ही कारवाई केली.
दरम्यान, याच पथकाने बोर्डा मडगाव येथील जी हार्डवेअरची तपासणी करून तेथे उत्पादनाची तारीख व अन्य निर्देश नसलेला सुमारे लाखभराचा माल जप्त केला . त्यातील बहुतेक वस्तू स्वयंपाकघरात वापरण्याचे साहित्य होते, असे सांगण्यात आले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment