डॉ. सदानंद हिंदे एलियस रोड्रिग्ज शेख नरुद्दीन सौ.जयश्री कामत इंद्रसेना शिरोडकर
पणजी, दि. ८ (प्रतिनिधी) : गोवा सरकारतर्फे उद्या ९ रोजी शिक्षकदिन साजरा केला जाणार आहे. कला अकादमीतील मास्टर दीनानाथ मंगेशकर सभागृहात सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला शिक्षणमंत्री बाबुश मोन्सेरात मुख्य अतिथी म्हणून उपस्थित असतील. या सोहळ्यात यंदाच्या उत्कृष्ट शिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
शिक्षण खात्याच्या संचालिका सेल्सा पिंटो यांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश चतुर्थीच्या सुट्टीमुळे हा कार्यक्रम उद्या आयोजित केला जात आहे. या दिवसाचे औचित्य साधून उत्कृष्ट शिक्षकांची राज्य सरकारतर्फे निवड केली जाते व त्यांना पुरस्काराने गौरविण्यात येते. यंदा उत्कृष्ट पुरस्कारासाठी निवडण्यात आलेल्या शिक्षकांत प्राथमिक विभागात- श्रीमती इंद्रसेना शिरोडकर (सरकारी प्राथमिक शाळा, मडकईवाडा-पिळर्ण बार्देश-गोवा) व श्रीमती जयश्री जे.कामत (सरकारी प्राथमिक शाळा, बोर्डा, मडगाव) माध्यमिक विभागांत- शेख नरूद्दीन ए. शेख (साहाय्यक शिक्षक,सरकारी उच्च माध्यमिक,सावर्डे-सत्तरी) व एलीयास रॉड्रिगीस (मुख्याध्यापक, सेंट रिटा उच्च माध्यमिक,मायणा- कुडतरी) उच्च माध्यमिक विभागांत- डॉ.सदानंद शिवनाथ हिंदे (श्री भूमिका उच्च माध्यमिक विद्यालय,पर्ये-सत्तरी) यांना प्राप्त झाले आहे.
शिक्षकदिनानिमित्त सर्वांत जास्त देणगी मिळवल्याबद्दल डिचोली(प्रथम),सासष्टी(द्वितीय) व मुरगाव(तृतीय) आदी तालुका भागशिक्षणाधिकाऱ्यांना बक्षिसे देण्यात येणार आहेत.
Monday, 8 September 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment