Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Saturday, 26 March 2011

महिलांना स्वयंरोजगाराचे धडे देऊन आत्मनिर्भर बनवा - पर्रीकर

पणजी, दि. २५ (प्रतिनिधी)
साड्या वाटून किंवा वस्त्रभेट योजना राबवून महिलांचा विकास केल्याचा टेंभा मिरवू नका. महिलांना स्वयंरोजगाराचे धडे देऊन स्वावलंबी व आत्मनिर्भर बनण्यास मदत करा, असा खोचक सल्ला विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी दिला. महिलांना मुलांच्या संगोपनासाठीची रजा मिळणे हा त्यांचा हक्क आहे व तो डावलता येणार नाही. बालकामगार कायद्याची अधिक कडकपणे अंमलबजावणी व्हावी, अशी जोरदार मागणीही त्यांनी यावेळी केली.
आज विधानसभेत महिला व बाल विकास, सहकार, पशूसंवर्धन व पशूवैद्यकीय खात्यांच्या मागण्यांवरील कपात सूचनांवर ते बोलत होते. गृहमंत्री रवी नाईक यांच्याकडील ही खाती पूर्णपणे निष्क्रिय ठरल्याचा ठपका पर्रीकर यांनी ठेवला. राज्यातील सहकार खाते दिशाहीन बनले असून सर्वत्र ‘स्वाहाःकार’ माजला आहे. गृह सोसायटी कायद्यात आवश्यक दुरुस्तीची गरज आहे. कुर्टी सहकारी पतसंस्थेतील गैरकारभार प्रकरणाची चौकशी राजकीय हस्तक्षेपामुळे रेंगाळत असल्याचा आरोप पर्रीकर यांनी केला. ङ्गोंड्यात खुद्द सहकारमंत्र्यांनी आपलीच जागा मार्केटिंग ङ्गेडरेशनला भाड्याने देण्याची कृती कितपत योग्य आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. राज्य सहकारी बँकेने एकरकमी कर्ज ङ्गेड योजनेचा गैरवापर केला आहे. या बँकेच्या कारभारावर वेळीच लक्ष दिले नाही तर या बँकेवर आर्थिक संकट ओढवणे अटळ आहे, असा इशाराही त्यांनी दिला. ही बँक केंद्रीय सहकार निबंधकांच्या अखत्यारीत येत असल्याचे निमित्त पुढे करून त्यांच्या गैरकारभारावर पांघरूण घालण्याचे प्रयत्न झाल्यास त्यांचा शिखर बँकेचा दर्जाच काढून घेणे उचित ठरेल, असेही पर्रीकर यांनी सुचवले. यंदा बँकेने नङ्गा दाखवण्यासाठी ठेवींवरील व्याजाची तरतूद कमी करून लेखा अहवालात ‘गङ्गला’ केल्याचा सनसनाटी आरोपही पर्रीकर यांनी केला.
पशुसंवर्धन खात्यामार्ङ्गत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकारकडून काहीच प्रयत्न केले जात नाहीत. दुग्धोत्पादनातील घट वाढत चालली आहे. अपना घराची दैना झाली आहे. बालकामगार कायद्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत नाही, अशी तक्रारही त्यांनी यावेळी केली.

No comments: