Sunday, 20 March 2011
काम नाही, पगार नाही वित्त सचिव एस. कुमारस्वामींचा इशारा
गोवा सरकारी कर्मचारी संघटनेला (जीजीईए) कोणतीही मान्यता नाही. त्यामुळे या संघटनेतर्फे घोषित केलेला संप पूर्णतः बेकायदेशीर ठरतो. संघटनेच्या सोमवार दि. २१ रोजीच्या संपामध्ये सहभागी होऊन कामावर गैरहजर राहणार्या कर्मचार्यांचा पगार कापून घेतला जाईल असा इशारा सर्वसाधारण प्रशासन सचिव एस. कुमारस्वामी यांनी दिला आहे. २ डिसेंबर २०१० रोजी जारी केलेला अत्यावश्यक सेवा व्यवस्थापन कायदा (एस्मा) अजूनही लागू आहे. त्यामुळे संपकरी कर्मचारी कारवाईस पात्र ठरतील असेही त्यांनी बजावले आहे. आज रात्री उशिरा जारी केलेल्या आदेशात त्यांनी संघटनेला बेकायदेशीर ठरवून कर्मचार्यांना या संपात सहभागी न होण्याचे आवाहन केले आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment