पणजी, दि. २४ (प्रतिनिधी)
प्राथमिक व पूर्वप्राथमिक शिक्षण इंग्रजीतून करण्याच्या विरोधात उद्या (दि. २५) भारतीय भाषा सुरक्षा मंचाची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत सरकारच्या या धोरणाविरोधात संपूर्ण राज्यात आंदोलन छेडण्याच्या दृष्टीने कृती ठरवली जाणार आहे. यात विविध शैक्षणिक संस्थांचे आणि अन्य सामाजिक संस्थांचे सुमारे ५०० प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. उद्या सकाळी १० वाजता पणजी येथील मराठा समाज सभागृहात या निर्णायक बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
माध्यम बदलाचा विरोध करण्यासाठी मराठी आणि कोकणी भाषाप्रेमींनी संघटित होऊन भारतीय भाषा सुरक्षा मंचाची स्थापना केली आहे. गुरुवारी या मंचाच्या निमंत्रक शशिकला काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री दिगंबर कामत आणि विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांना निवेदन सादर करण्यात आले. उद्या होणार्या बैठकीत कोणता निर्णय घेतला जाणार आहे याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
Friday, 25 March 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment