नवी दिल्ली, दि. २०
लीबियाच्या लष्करी तळावर फ्रान्स, इंग्लंड आणि अमेरिकेने हवाई हल्ले सुरू केले आहेत. लीबयाचे नेते कर्नल मोहम्मर गदाङ्गी यांनी बंडखोरांविरुद्ध चालवलेली लष्करी कारवाई चिरडून टाकण्यासाठी हे हवाई हल्ले करण्यात येत आहेत. हे हल्ले प्रामुख्याने लीबियाची राजधानी त्रिपोली, बेंगाझी प्रांत आणि भूमध्य समुद्राजवळच्या लीबियाच्या लष्करी तळावर करण्यात येत आहेत. टॉमहॉक क्षेपणास्त्रे आणि विमानांद्वारे हे बॉंबहल्ले करण्यात येत आहेत. लीबियाच्या भूदल आणि हवाई दलाला हादरा बसला आहे, अशी माहिती अमेरिकेचे उपनौदलप्रमुख विलियम गॉर्टनी यांनी दिली.बेंगाझी - अमेरिकेसह मित्रराष्ट्रांनी केलेल्या लष्करी कारवाईत ९४ नागरिक मृत्युमुखी पडल्याचा दावा लीबियातील शासकीय वृत्तवाहिनीने केला आहे. दरम्यान, अमेरिकेच्या सैन्य कारवाईला चोख प्रत्युत्तर दिले जाईल असा इशारा मुअम्मर गडाङ्गी यांनी दिला आहे.
अमेरिका आणि इंग्लंडने लढाऊ जहाजांवरुन आणि पाणबुड्यांतून लीबियावर ११० पेक्षा जास्त टॉमहॉक क्षेपणास्त्रांचा मारा केला आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीने लीबियासाठी हवाई बंदी केलेल्या क्षेत्रात ङ्ग्रान्सची लढाऊ विमाने घिरट्या घालत आहेत. लीबियातील २० लष्करी तळांचे हवाई हल्ल्यात मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या १९७३ च्या नियमानुसार, लीबियातील नागरिकांच्या हितासाठी तसेच संरक्षणासाठी ‘ऑपरेशन ओडिसी डॉन’ अंतर्गत आम्ही कारवाई करत आहोत, असेही गॉर्टनी यांनी सांगितले. लीबियाचे लष्कर ज्या हवाई संरक्षणाच्या भरवशावर जनआंदोलन चिरडत आहे, ते हवाई संरक्षण नष्ट करण्याची कारवाई अमेरिकेच्या नेतृत्वाखाली मित्र देशांनी वेगाने सुरू केली आहे. त्यांची रडार यंत्रणा, क्षेपणास्त्रे, शस्त्रसाठा नष्ट करण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.
याआधी संयुक्त राष्ट्र संघटनेने लीबियावर हवाई बंदी लागू करण्याचा ठराव केला. हा ठराव झाल्यानंतर ङ्ग्रान्सचे राष्ट्राध्यक्ष निकोलस सरकोझी यांनी लीबियाच्या नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी कारवाई करत असल्याचे जाहीर केले. ही घोषणा होताच ङ्ग्रान्सच्या २० लढाऊ विमानांनी लीबियाच्या आकाशात घिरट्या घालत बॉंबहल्ले केले. ङ्ग्रान्सपाठोपाठ इंग्लंड आणि अमेरिकेने कारवाई केली. इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरुन यांनी लीबियाच्या नागरिकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी कारवाई करत असल्याची घोषणा केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी लीबियाच्या नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी मर्यादित लष्करी कारवाईला परवानगी देत असल्याचे जाहीर केले.
दरम्यान, लीबियाच्या सरकारी वृत्तवाहिनीने पाश्चात्यांच्या हवाई हल्ल्याची गरज नाही, असे सांगितले. पाश्चात्य देशांनी विनाकारण लीबियात हस्तक्षेप करत ४८ नागरिकांना ठार केल्याचा दावा देखील सरकारी वृत्तवाहिनीने केला आहे.
लोकांना शस्त्रे वाटणार
पाश्चात्य देशांनी लीबियाच्या सैन्याला लक्ष्य करत सुरू केलेल्या कारवाईचा कर्नल गदाङ्गी यांनी निषेध केला आहे. लीबियाच्या नागरिकांना शस्त्र वाटेन, त्यांना पाश्चात्यांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी मदत करेन, असेही श्री. गदाङ्गी यांनी सांगितले. पाश्चात्य देशांविरोधात धर्मयुद्ध सुरू झाल्याची घोषणा त्यांनी केली, असे वृत्त अल जझिरा या वृत्तवाहिनीने प्रसारित केले आहे.
Monday, 21 March 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment