मडगाव, दि. १२ (प्रतिनिधी) - गोव्यात हिंदूंच्या मंदिरांवरील आघात व मूर्ती तोडफोडीचे वाढते प्रकार अत्यंत चिंताजनक आहेत. त्यावर तोडगा काढण्यासाठी सरकारला सहकार्यासाठी भाजपची तयारी आहे. मात्र विद्यमान कॉंग्रेस सरकारने अजूनही त्यादृष्टीने पुढाकार घेतलेला नाही. त्यामुळे या प्रश्र्नावर सरकारच्या हेतूबद्दलच शंका येते, अशी खंत विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी आज येथे व्यक्त केली.
फातोर्डा महिला मंडळाच्या उद्घाटनासाठी आल्याप्रसंगी येथील "कदम प्लाझा'मध्ये त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक वार्तालाप केला. सरकारच जर पुढाकार घेणार नसेल तर आम्ही तरी काय करणार असा सवाल त्यांनी केला.
मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी पारोडा येथील मूर्तिभंजन प्रकारानंतर येथे सरस प्रदर्शनाचे उद्घाटन समारंभानंतर पत्रकारांशी बोलताना या प्रकरणी सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची जी घोषणा केली होती त्याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, आपल्या पक्षाकडे अजून तरी तसा कोणताच प्रस्ताव आलेला नाही. वास्तविक अशा संवेदनशील प्रश्र्नांकडे पक्षीय दृष्टिकोन बाजूस ठेवून लक्ष द्यायला हवे.
आपण अशा बाबतीत खुला व्यवहार ठेवला आहे. असे सांगून आपल्या आक्षेपानंतरच ब्रॉडब्रॅण्ड सेवेबाबत संबंधित कंपनीने आपला प्रस्ताव कमी केला व त्यामुळे सरकारचे किमान ४५ कोटी वाचले, ते म्हणाले.
कचराप्रश्नी आपल्याकडे संपूर्ण राज्यास पूरक ठरेल असाच तोडगा आहे. पण सरकारची अनास्था आड येते. कचराविषयक समितीच्या आजवर फक्त दोनच बैठका झालेल्या आहेत. सरकारला त्यावरून विरोधी पक्षाची मदतच नको आहे असे दिसते पण यात जनतेचा बळी जात आहे.
आमची भूमिका विरोधी पक्षाची आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांना विरोध करणे हे आमचे कामच आहे. राज्यकत्यार्ंना जर सरकार चालविता येत नसेल तर त्यांनी मुकाट घरी बसावे,असेही ते म्हणाले.
Wednesday, 12 November 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment