Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 10 November 2008

कोठडी संपल्याने रोहित आज बाल न्यायालयात

पणजी, दि. ९ (प्रतिनिधी) - रोहित मोन्सेरात याची सहा दिवसांची पोलिस कोठडी उद्या संपत असल्याने त्याला बाल न्यायालयात हजर केले जाणार आहे. गेल्या शुक्रवारी तात्पुरता बाल न्यायालयाचा ताबा असलेले न्यायाधीश प्रमोद कामत यांनी रोहित याचा जामीन अर्ज फेटाळून लावून हे प्रकरण अतिसंवेदनशील असल्याने त्याला नियमित न्यायालयासमोर हजर केले जावे, असे म्हटले होते तसेच त्याच्या तीन दिवसांच्या पोलिस कोठडीतही वाढ करण्यात आली होती.
रोहित मोन्सेरात याला अटक केल्यानंतर त्याचे वडील शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी आपण जामीन अर्जासाठी अर्ज दाखल करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. परंतु, त्यानंतर रोहित याला म्हापसा प्रथम वर्ग न्यादंडाधिकाऱ्यांनी तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्यानंतर त्याच्या दुसऱ्याच दिवशी मोन्सेरात यांचे वकील हरुण ब्राझ डिसा यांनी रोहित याच्या जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.
ते अश्लील एसएमएस आणि अश्लील छायाचित्रांचे अद्याप चाचणी करण्यात आलेली नाही. सदर फोटो आणि एसएमएस न्यायालयात सादर करण्यापूर्वी पोलिसांना या एसएमएस व छायाचित्राची सत्यता पडताळून त्याचा अहवाल सादर करावा लागणार आहे. सदर "एसएमएस' कोणत्या मोबाईलवरून आले, तसेच त्या "एसएमएस' व अश्लील छायाचित्रात फेरफार करण्यात आलेली नाही ना, हे पडताळून पाहणे अत्यंत महत्त्वाचे बनले आहे. संशयिताच्या वकिलाने रोहित याच्या विरोधात कोणतेच वैद्यकीय पुरावे नसल्याचा दावा केला आहे. त्यामुळे पोलिस आता कोणत्या पद्धतीने आपली बाजू न्यायालयात मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.

No comments: