पोलिस यंत्रणा प्रचंड दबावाखाली
पणजी, दि. ११ (प्रतिनिधी)- त्या जर्मन महिलेने रोहित मोन्सेरातविरोधात सादर केलेली बलात्काराची तक्रार मागे घेण्यासाठी पोलिसांना पत्र पाठवले असले तरी, आम्ही ती तक्रार मागे घेणार नाही, आणि ती मागे घेऊही शकतही नाही. तक्रार मागे घेण्यासाठी तिने पाठवलेले पत्र आता पोलिसांसाठी नगण्य आहे,' असे आज एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले. या प्रकरणावरून सध्या जोरदार राजकारण सुरू झाले असून पोलिसांची त्यामुळे विलक्षण कोंडी झाली आहे. या स्थितीत पोलिस महानिरीक्षकांनी गोव्याबाहेरच राहणे पसंत केले आहे. त्याचप्रमाणे या प्रकरणी कोणीच पोलिस अधिकारी स्पष्टपणे बोलायलाही तयार नाही. त्यामुळे राजकीय नेत्याच्या दबावाखाली पोलिस अधिकारी कसे वावरत आहेत, याचे मासलेवाईक उदाहरण पाहायला मिळत आहे.
दरम्यान, त्या जर्मन महिलेने पोलिस तपासाला सहकार्य करणे बंद केले आहे. त्यामुळे पोलिसांसमोर मोठीच अडचण निर्माण झाली आहे. तिने अद्याप त्या पीडित मुलीच्या संगणकाचे हार्डडिस्क दिले नसल्याने तपासात अडचण येत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. अश्लील छायाचित्र आणि "एसएमएस' यांची सत्यासत्यता पडताळून पाहण्यासाठी ते न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवले आहेत. सध्या पोलिस ते अश्लील छायाचित्र, एसएमएस व मोबाईल संचासंदर्भातील अहवालाची प्रतीक्षा करीत आहेत.
Wednesday, 12 November 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment