पणजी,दि. ८ (प्रतिनिधी) - बंगळूर येथील "वोखार्ट' इस्पितळात सांधेदुखी व सांंधारोपणावर विशेष उपचारामुळे या दुखण्यामुळे त्रस्त रुग्णांना मोठा दिलासा मिळाल्याची माहिती या इस्पितळाचे अस्थिशल्य विशारद डॉ.संजय पै यांनी दिली.सांधेदुखी किंवा सांधारोपणाबाबत उपचार करणारे देशातील एक अग्रेसर इस्पितळ म्हणून वॉखार्टने आपली ओळख बनवली असून या त्रासामुळे त्रस्त लोकांनी या इस्पितळाशी संपर्क साधावा,असे आवाहनही डॉ.पै यांनी केले.
आज येथे पत्रकारांशी वार्तालाप करताना डॉ.पै यांनी ही माहिती दिली.गोव्यात सांधेदुखी व सांधारोपणाबाबत उपचाराची सोय नसल्याने लोक विविध इतर राज्यांत जातात. इतर राज्यांच्या तुलनेत खर्च व उपचाराची पद्धत यात वोखार्ट इस्पितळात विशेष सोय असल्याने या उपचारासाठी इथे येणेच लोक पसंत करतात,असेही त्यांनी सांगितले. या वर्षी सुमारे ५५० सांधारोपणाची प्रकरणे हाताळली जाणार असल्याची माहिती देत या दुखण्यावर उपचार उपलब्ध असल्याची माहिती मिळाल्याने आता कुठे लोकांत जागृती निर्माण होत असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. वोखार्ट इस्पितळाचा समावेश गोवा सरकारने मेडिक्लेम योजनेअंतर्गत केल्याने या विमा योजनेचा लाभही या उपचारासाठी मिळू शकतो. या शस्त्रक्रियेसाठी ८० हजारापासून ते चार ते पाच लाख रूपये खर्च येतो. सध्या विविध कंपन्यांकडून आलेल्या आरोग्य विमा योजनांकडे अजूनही दुर्लक्ष करण्याची मानसिकता बदलावी लागेल,असा सल्ला देत या परिस्थितीत आरोग्य विमा उतरवणे ही गरज असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. १९९१ साली सांधारोपणाचे पहिले ऑपरेशन केलेल्या डॉ.पै यांनी आत्तापर्यंत सुमारे तीन हजारांवर ऑपरेशन केल्याची माहितीही यावेळी दिली. बंगळूर बनरगट्टा येथे असलेले वोखार्ट इस्पितळ गोव्यातील लोकांना जवळचे आहेच परंतु येथील डॉक्टर किंवा इतर कर्मचारी वर्ग यांना मराठी व कोकणी भाषा अवगत असल्याने येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना कोणतीही संपर्काची किंवा आपल्या दुखण्याबाबत विस्तृतपणे सांगण्याची अडचण निर्माण होत नाही,अशी माहितीही यावेळी देण्यात आली.
दरम्यान,सांधारोपणाबाबत लवकरच बांबोळी येथील गोवा आरोग्य महाविद्यालयात लवकरच येथील डॉक्टरांसाठी खास ऑपरेशन कार्यशाळा घेण्याचाही विचार असल्याची माहिती त्यांनी दिली.
Sunday, 9 November 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment