"त्या' जर्मन महिलेची कैफियत
पणजी, दि. १० (प्रतिनिधी) - गोवा हा सुंदर प्रदेश आहे. मात्र आता येथे जगणे आमच्यासाठी नरक बनले आहे. आमचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. माझ्या मुलीला वाईट संगत लागली. त्यामुळे आम्ही याठिकाणी अजून जास्त काळ थांबू शकत नाही. या स्थितीत माझ्या मुलीवरील अत्याचार प्रकरणी लढा देणे मला शक्य नसून ते फाईलबंद केले जावे, असे पत्र त्या पीडित जर्मन मुलीच्या आईने पोलिसांना लिहिले आहे. त्यामुळे राज्य प्रशासनाबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या पत्रातील तपशीलात म्हटले आहे की, तक्रार दाखल केल्यापासून आमचे जगणेच मुश्कील झाले आहे. आरोप प्रत्यारोपाचे सत्र सुरू आहेच. त्यामुळे दुसरी "ब्रिटिश तरुणीचा मृत्यू भाग-२' होण्याची आम्हाला भीती सतावत आहे. आमची रात्रीची झोप उडाली आहे. आमच्या वकिलावर झालेला प्राणघातक हल्ल्यामुळे आम्हीही भीतीच्या छायेत वावरत आहोत.
त्यामुळे पुन्हा राज्य प्रशासनाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Monday, 10 November 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment