Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 10 November 2008

आज तुलसीविवाह

मडगाव, दि. ९ (प्रतिनिधी) - देव्हाऱ्यांतील श्रीकृष्णाचा दारी उभ्या असलेल्या तुलसीशी विवाह लावणारा पवित्र असा तुलसीविवाह उद्या सोमवारी साजरा होत असून मडगाव बाजारात आज रविवार असूनही त्यासाठींचे सामान खरिदण्यास लोकांची झुंबड उडालेली जाणवली.तुलसी विवाहानंतर मंगल कार्यांची वाट मोकळी होत असल्यानेही तुलसीविवाहाची सारेच आतुरतेने वाट पहात असतात.
या पारंपरिक विवाहासाठी लागणारा ऊस, आवळे-चिंचा,पोहे,चुरमुरे,कागदी फुले, जिन्याच्या काठ्या यांची बाजारात मोठ्या प्रमाणात आवक झालेली असून येथील पिंपळकट्ट्या जवळच्या मोकळ्या जागेत त्या वस्तू घेऊन बसलेले विक्रेते पाहावयास मिळाले. आज रविवारची सुट्टी साधून लोकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली . या विवाहासाठी मोठ्या प्रमाणात ऊस बाजारात येतो . पिंपळ कट्ट्याजवळ त्याच्या राशी दिसून आल्या.
आवाळे-चिंचा यांची आवक खेडेगावातून होते व गेल्या काही वर्षांपासून खेड्यातील महिला त्यांची विक्री करताना दिसतात, मडगावात बोरी-शिरोडा तसेच रिवण ,बेंदोडे-पाडी या भागातून या वस्तू विक्रीस येतात. यंदाही तशाच त्या आलेल्या आहेत. वाढत्या महागाईनुसार त्यांचे दरही वाढल्याचे काहीनी सांगितले. पण हा उत्सव समाजाच्या सर्व थरात उत्साहाने साजरा केला जात असल्याने त्या दरांची पर्वा न करता लोकांनी त्या वस्तू खरेदी केल्या.

No comments: