Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Monday, 10 November 2008

मुख्यमंत्र्यांना सहआरोपी करा

हल्लाप्रकरणी आज आयरिशची राज्यपालांकडे मागणी
पणजी, दि. ९ (प्रतिनिधी) - प्राणघातक हल्ला करण्यासाठी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी ""ग्रीन सिग्नल'' दिल्याचा आरोप करणारे"ऊठ गोयकारा' संघटनेचे पदाधिकारी उद्या सकाळी राज्यपाल एस.एस.सिद्धू यांची भेट घेणार आहेत. यावेळी श्री. कामत यांना त्वरित मुख्यमंत्रिपदावरून हटवण्याची तसेच या हल्ला प्रकरणात त्यांना सहआरोपी करण्याची मागणी करणार आहेत. दि. १३ ऑक्टोबर रोजी ऊठ गोयकारा संघटनेचे प्रवक्ते ऍड.आयरिश रॉड्रिगीस आणि प्रजल साखरदांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे महासुत्रधार मुख्यमंत्री दिगंबर कामत असल्याचा आरोप ऍड. रॉड्रीगीज यांनी केला आहे.
हल्ला होण्याच्या तीन दिवसांअगोदर मुख्यमंत्र्यांच्या सरकारी निवासस्थानी हल्ल्याच्या सूत्रधारांची गुप्त बैठक झाली होती,असा दावा ऍड. रॉड्रिगीस यांनी यापूर्वी केला आहे. या बैठकीत शिक्षण मंत्री बाबूश मोन्सेरात, आमदार आग्नेल फर्नांडिस, तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते, असा दावाही त्यांनी त्यांनी केला आहे.
आमच्यावर झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार संदीप वायगणकर असला तरी, मुख्यसुत्रधार बाबूश मोन्सेरात आणि महासुत्रधार मुख्यमंत्री दिगंबर कामत असल्याचे ऍड. रॉड्रिगीस यांनी म्हटले आहे.

No comments: