Friday, 14 November 2008
योगेंद्र मकवाना यांची हकालपट्टी
नवी दिल्ली, दि. १३ - राष्ट्रीय सरचिटणीस पदावरून मार्गारेट अल्वा यांना अर्धचंद्र देण्यात आल्याचे उदाहण ताजे असतानाच आता पक्षाची धोरणे व कार्यपद्धती यावर जाहीर टीका केल्याबद्दल अखिल भारतीय कॉंग्रेसच्या अनुसूचित जमाती विभागाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री योगेंद्र मकवाना यांना त्यांच्या पदावरून काढून टाकण्यात आले आहे. मकावाना यांनी केलेल्या विधानांची पक्षश्रेष्ठींनी गंभीर दखल घेऊन त्यांच्यावर विनाविलंब कारवाईचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पक्ष प्रवक्ते शकील अहमद यांनी आज येथे पत्रकारांना दिली. मकवाना हे स्वतःचा नवा पक्ष काढण्याच्या तयारीत असून त्याचे अध्यक्षपद त्यांच्याकडेच असेल अशी माहितीही कॉंग्रेसला मिळाल्याचे अहमद म्हणाले. कॉंग्रेसमध्ये पैसे घेऊन तिकीटे विकली जातात, असा जाहीर आरोप श्रीमती अल्वा यांनी केला होता. त्यामुळे त्यांच्याकडील सर्व पदे यापूर्वीच काढून घेण्यात आली आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment