ब्रिटनची पाकिस्तानला तंबी
भाजपाध्यक्ष गडकरींनी घेतली विदेशमंत्र्यांची भेट
लंडन, दि. २० : ‘अल् कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनला अमेरिकेने ठार केले. याच संधीचा ङ्गायदा घ्या आणि आपल्या भूमीतील सर्व दहशतवादी शिबिरे नष्ट करा,’ अशी तंबी ब्रिटनने पाकिस्तानला दिली आहे. ब्रिटनचे विदेशमंत्री विल्यम हेग यांनी आज भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांची भेट घेतली आणि याबाबतची माहिती दिली.
सध्या ब्रिटनच्या भेटीवर असलेले पाकिस्तानचे पंतप्रधान युसूङ्ग रजा गिलानी यांची हेग यांनी भेट घेऊन दहशतवादी शिबिरे नष्ट करण्यावर आपल्या देशाची भूमिका स्पष्ट केली होती. दहशतवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी आपले सरकार अतिशय गंभीर असून, सर्व दहशतवादी शिबिरे नष्ट करण्यासाठी ठोस पुढाकार घेण्यात आला आहे, अशी ग्वाही गिलानी यांनी आपल्याला दिली असल्याचे हेग यांनी गडकरी यांना सांगितले.
‘पाकमधील काही प्रदेश दहशतवादी आणि धार्मिक कट्टरपंथीयांच्या ताब्यात असल्याने दहशतवादविरोधी लढ्यात पाक सरकारला बर्याच अडचणी जात आहेत. पाक सरकारच्या कारवाईमुळे संतप्त झालेले दहशतवादी पाकमध्येच हल्ले करीत आहेत. असे असले तरी पाक सरकार दहशतवाद पूर्णपणे नष्ट करण्यासाठी लवकरच ठोस पावले उचलणार आहे,’ असे हेग यांनी गिलानी यांच्या हवाल्याने गडकरी यांना सांगितले.
भारत आणि पाक यांच्यातील द्विपक्षीय संबंधावर आम्हाला काहीच भाष्य करायचे नाही. पण, उभय देशांनी आर्थिक सहकार्याचे संबंध अधिकाधिक वृद्धिंगत करायला हवे, असे आम्हाला वाटते, असेही हेग यांनी स्पष्ट केले.
भारतात इतके दहशतवादी हल्ले होऊनही भारत देश आर्थिक विकासावर भर देत आहे. भारताचेच उदाहरण डोळ्यापुढे ठेवून पाकनेही आपल्या आर्थिक विकासांवर भर द्यायला हवा, असा सल्लाही हेग यांनी गिलानी यांना दिला.
लादेनला अमेरिकेने ठार केले असल्यामुळे आपल्या देशातील दहशतवादी शिबिरे नष्ट करण्याची मोठी संधी पाकपुढे उपलब्ध झाली आहे. पाक सरकारने या संधीचा ङ्गायदा घ्यायला हवा, असा सल्लाही आपण गिलानी यांना दिला असल्याचे हेग यांनी सांगितले. यावेळी गडकरी म्हणाले की, भारताविरोधात सुरू असलेली दहशतवादी मोहीम थांबविण्यासाठी ब्रिटनने आपला प्रभाव वापरून पाकवर दबाव आणावा.
गडकरी यांच्यासोबत चर्चा करताना हेग यांनी अलीकडेच मुंबईत झालेल्या तिहेरी बॉम्बस्ङ्गोट मालिकेचा निषेध केला. यावेळी गडकरी यांनी स्पष्ट केले की, दहशतवादी कारवाया थांबत नाही तोपर्यंत पाकिस्तानशी शांततेच्या मुद्यावर चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही.
भाजपशासित राज्यांत गुंतवणुकीचे आवाहन
हेग यांच्यासोबत चर्चा करताना गडकरी यांनी भाजपाशासित राज्यांमध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन ब्रिटिश आणि युरोपियन समुदायाला केले. हरित तंत्रज्ञान तसेच अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात गुंतवणुकीसाठी चांगला वाव असल्याची माहिती गडकरी यांनी दिली.
भारत आणि ब्रिटन यांच्यातील आर्थिक संबंध अतिशय मजबूत असून, आमचे सरकार हे संबंध आणखी वृद्धिंगत करण्याच्या दिशेने पावले उचलत असल्याचे हेग यांनी गडकरींना सांगितले.
Thursday, 21 July 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment