सावंतवाडी, दि. २२ (प्रतिनिधी): मालवणजवळच्या तळगाव येथे दरड कोसळल्याने कोकण रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. गेल्या आठवड्यात ठप्प झालेली वाहतूक काल गुरुवारीच सुरळीत करण्यात आली होती. मात्र, आज दरड कोसळल्याने ती पुन्हा ठप्प झाली आहे. या घटनांमुळे पावसाळ्यातील कोकण रेल्वेच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून सावंतवाडीमार्गे मुंबईकडे जाणार्या सर्व रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. उद्यापर्यंत रेल्वेमार्ग सुरळीत होईल अशी आशा रेल्वे प्रशासनाने व्यक्त केली आहे.
दरम्यान, तळगाव येथे रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि मदत व बचाव पथकाचे सदस्य पोहोचले असून, ढिगारे बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.
दरड कोसळण्याच्या घटनेमुळे अनेक रेल्वे गाड्या विविध मार्गांवर खोळंबल्या असून, यामुळे शेकडो प्रवासीही अडकून पडले आहेत. या प्रवाशांंना इच्छित स्थळी नेण्यासाठी रेल्वे प्रशासन बसची व्यवस्था करीत आहे, अशी माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.
Saturday, 23 July 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment