मडगाव, दि. १७ (प्रतिनिधी): कुडाळ - सिंधुदुर्ग येथे काल मोठी दरड कोसळल्यामुळे ठप्प झालेली कोकण रेल्वेची सेवा आज सायंकाळपासून पूर्ववत सुरू झाली. मात्र, या दुर्घटनेमुळे काही गाड्या अन्य मार्गे वळविल्या तर काही गाड्या विलंबाने धावत आहेत.
कुडाळनजीक दरडीचा मोठा भाग कोसळून रेल्वे मार्गावर आला होता व त्यामुळे काल मध्यरात्रीपासून रेल्वेसेवा ठप्प झाली होती. गेले काही दिवस कोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्यास महामंडळाने सर्व यंत्रणा सज्ज ठेवली आहे. त्यामुळे कालची दुर्घटना घडताच लगेच मदतकार्य सुरू करण्यात आले. मात्र, गाड्यांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, सदर अपघातामुळे विविध स्थानकांत गाड्या रोखून धरण्यात आल्या तर लांब मार्गावरील गाड्या लोंढामार्गे वळविण्यात आल्या. त्यामुळे बहुतेक सर्वच गाड्या उशिराने धावू लागल्या होत्या. मात्र, आज दुपारनंतर वाहतूक पूर्ववत सुरू झाल्याने ‘कोकणकन्या’ मडगावहून वेळेवर सुटली.
Monday, 18 July 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment