संसदेत राष्ट्रपतींची ग्वाही
नवी दिल्ली, दि. २१ : वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी तसेच सार्वजनिक जीवनात बोकाळलेल्या भ्रष्टाचारासारख्या समस्यांचा सामना करण्यासाठी सरकार प्राधान्य देणार आहे. आज सार्वजनिक जीवनात प्रामाणिकपणा व सत्यनिष्ठता व अखंडतेेच्या उणिवेमुळे ज्या समस्या निर्माण झाल्या आहेत त्या प्रामुख्याने सोडविण्याचे सरकारचे प्रयत्न राहणार आहे, असे राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी आपल्या अभिभाषणात म्हटले आहे. संसदेच्या अंदाजपत्रकी अधिवेशनाचा प्रारंभ आज झाला. दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला राष्ट्राध्यक्षा संबोधित होत्या.
वाढत्या महागाईपासून सर्वसामान्य जनतेचे संरक्षण करण्याला सरकारचे प्राधान्य आहे, असे सांगून त्या पुढे म्हणाल्या, काळ्या पैशाने सरकारही चिंतित असून ही समस्याही समाप्त करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे. काळा पैसा, विशेषकरून विदेशी बँकांतील काळ्या पैशासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून ज्या बातम्या येत आहेत त्याने सरकार चिंतित आहे.
समाजातील गरीब, वंचित व दुर्बल घटकांची आर्थिक विकासातील भागीदारी निश्चित करण्याबरोबरच आर्थिक विकासाचा वेग कायम ठेवण्याला सरकार महत्त्व देत आहे असे त्या म्हणाल्या. आपल्या ५० मिनिटांच्या भाषणात त्यांनी वाढत्या महागाईवर चिंता व्यक्त करीत महागाईवर नियंत्रण ठेवण्याला सरकार प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले. सार्वजनिक जीवनात बोकाळलेला भ्रष्टाचाराला लगाम घालण्यासाठी तसेच संसदीय तसेच सरकारी प्रशासकीय कारभारात पारदर्शिकता आणण्यासाठी काय उपाययोजना करता येऊ शकतील, यावर एक मंत्रिगट विचारविनिमय करीत आहे. यात वेळ पडल्यास मंत्र्यांचे अधिकार मर्यादित करण्याच्या उपाययोजनाही आहेत.
दहशतवाद, जातीय तसेच माओवादी हिंसाचार आज देशासमोर आव्हाने निर्माण करत आहेत, हे मान्य करून राष्ट्राध्यक्षा पुढे म्हणतात, मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारने सुरक्षा यंत्रणेत मोठे बदल केेले आहेत. समुद्रकिनार्यावरील सुरक्षा आणखी कडक करण्यात आली आहे. यासाठी राज्य सरकारांना अधिकाधिक आर्थिक साह्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नक्षलग्रस्त भागातील पोलिस भरतीवर अधिक जोर देत पोलिस दलात वाढ करण्यात आली आहे. त्याचे परिणामही दिसू लागले आहेत.
अलिकडेच इजिप्तमध्ये झालेल्या क्रांतीचा उल्लेख करत तेथे झालेल्या बदलाचे स्वागत केले आहे. लोकशाहीच्या स्थापनेसाठी सुरू असलेल्या या प्रयत्नांचे आम्ही स्वागत करतो, असे त्यांनी म्हटले आहे.
भारत-पाकिस्तान संबंधांवर बोलताना त्या म्हणाल्या, या दोन्ही शेजारी देशांमधील संबंध चांगले व्हावेत हे आम्हालाही वाटते परंतु त्यासाठी पाकिस्तानने आधी आपल्या भूमीवरून भारतविरोधी कारवाया करणार्या दहशतवादी संघटनांची पाळेमुळे उखडून ङ्गेकली पाहिजेत.
निवडणूक सुधारणांसंदर्भात बोलताना राष्ट्राध्यक्षा म्हणाल्या, निवडणूक कायद्यांत सुधारणा व्हाव्यात असे सर्वच राजकीय पक्षांना वाटत असल्याने ते यासाठी एकत्र येऊन बदल घडवून आणतील, अशी मला आशा आहे. यासाठी केंद्र सरकारने यासाठी एक समितीही स्थापन केली आहे. राज्य सरकारांबरोबर चर्चा करून यावर्षाच्या एप्रिलमहिन्यापर्यंत यासंदर्भात एक राष्ट्रीय परिषदही आयोजित करण्याचा प्रयत्न केला जाईल. न्यायव्यवस्था, त्यातील सुधारणांची अपेक्षा, त्यासाठी केले जाणारे प्रयत्न यावरही त्यांनी मते व्यक्त केली. महिला आरक्षण विधेयकावर बोलताना त्या म्हणाल्या मला आशाही की लोकसभेत हे विधेयक मंजूर केले जाईल. हे विधेयक राज्यसभेने याआधीच मंजूर केलेले आहे, हे येथे उल्लेखनीय.
तेलंगणा समर्थकांच्या घोषणा
राष्ट्रपतींचे अभिमाषण संपायला आले असताना आंध्र प्रदेशातील काही कॉंग्रेस समर्थक सदस्यांनी स्वतंत्र तेलंगणाच्या समर्थनार्थ घोषणा दिल्याने काही काळ राष्ट्राध्यक्षांच्या अभिभाषणात अडथळा आला. ‘जय तेलंगणा’, ‘आम्हाला स्वतंत्र तेलंगणाच हवा’ अशा घोषणा देत कॉंगे्रस सदस्य तेलंगणासमर्थनाचे ङ्गलक ङ्गडकवीत होते. परंतु उपराष्ट्रपती अन्सारी ज्यावेळी बोलण्यास उभे राहिले त्यावेळी या सदस्य आपापल्या जागी बसलेले होते.
Tuesday, 22 February 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment