पणजी, दि. २५ (प्रतिनिधी)
अपना घर येथून दोन मुलांनी आज पळ काढण्याचा प्रयत्न केला असता त्यातील एकट्याला पकडण्यात येथील कर्मचार्यांनी यश मिळवले तर दुसरा पळ काढण्यात यशस्वी ठरला. पकडण्यात आलेल्या मुलाला रिमांडसाठी हजर करण्यात येणार आहे.
मडगाव येथे एका घरफोडी प्रकरणात पकडण्यात आलेल्या दोन मुलांनी आज अपना घरमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यात एकटा निसटला तर त्याचा दुसरा साथीदार मात्र पळून जाण्यास अपयशी ठरला. त्याला वेळीच येथील कर्मचार्यांनी पकडण्यात यश मिळवले. अपना घर मधून पळून जाण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांपूर्वी वाढले होते. अलीकडे हे प्रमाण कमी झाले असतानाच आजच्या घटनेमुळे पुन्हा एकदा या प्रकाराला उजाळा मिळाला आहे. पकडण्यात आलेल्या मुलाला उद्या रिमांडसाठी हजर केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Saturday, 26 February 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment