पणजी महापालिका निवडणूक
९ दुरंगी, १३ तिरंगी, ६ चौरंगी, १ पंचरंगी व १ सहारंगी लढती
पणजी, दि. २५ (प्रतिनिधी)
पणजी महानगरपालिकेच्या ३० प्रभागांसाठी येत्या १३ मार्च २०११ रोजी होणार्या निवडणुकीसाठी एकूण ९२ उमेदवार रिंगणात उरले आहेत. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १५२ उमेदवारांपैकी ६० उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. एकूण ३० प्रभागांसाठी होणार्या या निवडणुकीत ९ प्रभागांत दुरंगी, १३ प्रभागांत तिरंगी, ६ प्रभागांत चौरंगी, १ पंचरंगी व एका प्रभागात सहा उमेदवार एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. अखेरच्या चित्राअंती ही लढत बाबूशसमर्थक पॅनल पणजी विकास आघाडी, भाजप समर्थक पणजी फर्स्ट आघाडी व राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत उमेदवारांतच होणार आहे.
आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अर्ज मागे घेण्यासाठी एकच रांग लागली होती. त्यात तब्बल ६० उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने प्रभागांचे चित्र स्पष्टच झाले.दरम्यान, जादा उमेदवार रिंगणात उतरल्यास मतांचे विभाजन होण्याची शक्यता होती. कोणत्याही पद्धतीत पणजी महापालिकेत यंदा चांगले उमेदवार निवडून यावेत अशी इच्छा बहुतांश इच्छुकांनी व्यक्त करून आपले अर्ज मागे घेतल्याचे दिसून आले. पणजी मतदारसंघावर आपली पकड मिळवण्यासाठी शिक्षणमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेचीच बनवली आहे. पणजीचे आमदार तथा विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी मात्र पणजीतील मतदार सूज्ञ आहेत, तेव्हा महापालिका निवडणूकीद्वारे या सुंदर शहराचे भवितव्य ते योग्य पद्धतीने ठरवणार आहेत, असा विश्वास व्यक्त केला. राष्ट्रवादीचे समर्थन लाभलेल्या उमेदवारांनी मात्र बाबूश पॅनलसमोर जोरदार आव्हान उभे करून त्यांना दणका देण्याचीच व्यूहरचना आखल्याचे स्पष्ट झाले आहे.
आज जाहीर करण्यात आलेल्या अंतिम प्रभागांतील उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे.
दुरंगी लढत
प्रभाग-४ः प्रभाकर डोंगरीकर व कॅरोलिना पो, प्रभाग-५ः शीतल नाईक व शुभदा शिरगावकर, प्रभाग-७ः मारिया आल्मेदा व श्वेता लोटलीकर, प्रभाग-१२ः प्रसाद आमोणकर व वैदही नाईक, प्रभाग-१५ः शेखर डेगवेकर व मंगलदास नाईक, प्रभाग-२२ः हेमा चोपडेकर व माया तळकर, प्रभाग-२५ः शुभदा धोंड व नमिता नार्वेकर, प्रभाग-२७ः शुभम चोडणकर व सुरज कांदोळकर, प्रभाग-२८ः निवेदिता नाईक चोपडेकर व सुजाता हळदणकर यांच्यात थेट लढत होणार आहे.
तिरंगी लढत
प्रभाग-१ः लोबो डिसोझा, नॅटी पो व किरण जांबावलीकर, प्रभाग-६ः आलेक्स फेलिझादो, बेंटो सिल्वेस्टर व अनंत शेणई गायतोंडे, प्रभाग-८ः तुकाराम चिनावर, दुर्गा केळुस्कर व टोनी रॉड्रिगीस, प्रभाग-९ः सुरेंद्र फुर्तादो, सुदिन कामत व डॉम्नीक रॉड्रिगीस, प्रभाग-१०ः रूथ फुर्तादो, माया जोशी व तोशा खुराडे, प्रभाग-११ः मनोज पाटील, मखिजा पिंटो व ऍश्ली रोझारीयो, प्रभाग-१३ः भारती हेबळे, मंगला कारापुरकर व सिमा पेडणेकर, प्रभाग-१९ः अशोक नाईक, यतीन पारेख व प्रसाद सुर्लेकर, प्रभाग-१६ः पास्कॉला मास्कारेन्हास, सतिशा शिरोडकर व निना सिलीमखान, प्रभाग-१७ः नीलेश खांडेपारकर, उदय मडकईकर व प्रजोत वायंगणकर, प्रभाग-२१ः महेश चांदेकर, गंगाराम काळे, केदार शिरगांवकर, प्रभाग-२३ः रूद्रेश चोडणकर, शैलेश उगाडेकर व सत्चीत वायंगणकर, प्रभाग-२९ः वनिता फर्नांडिस, प्रतिमा होबळे व याधव नाईक यांच्यात लढत होणार आहे.
चौरंगी लढत
प्रभाग-३ः सॅबेस्तीयानो बर्रोटो, मार्गारिटा कोएलो, रोझारीया पो, ग्लोरीया पो, प्रभाग-१९ः डियोदिता डीक्रुझ, नीता गायतोंडे, विरा नूनीस, मारिया पॅरेरा, प्रभाग-२०ः अविनाश भोसले, सुरज कांदे, विरेन महाले व कृष्णा शिरोडकर, प्रभाग-२४ः जितेंद्र केणी, दिक्षा माईणकर, मोहनलाल सरमळकर व मंदा शेटये, प्रभाग-२६ः ऑस्कर कुन्हा, रूई फेरेरा, एडवर्ड डेनीस व प्रेमानंद नाईक, प्रभाग-३०ः रूपेश हळर्णकर, श्यामसुंदर कामत, विविना नास्नोडकर व आयरिश रॉड्रिगीस यांच्यात लढत होईल.
पंचरंगी लढत
प्रभाग-१४ः समीर च्यारी, रत्नाकर फातर्पेकर, लक्ष्मण खराडे, रविश खराडे व सीताराम नाईक हे भिडणार आहेत. सहारंगी लढत
एकमेव प्रभाग-२ः नाझारेथ काब्राल, नेल्सन काब्राल, इव्हारीस्टो फर्नांडिस, रवींद्र कुर्टीकर, राजू मार्टीन्स व महेश शिरोडकर हे सहा उमेदवार रिंगणात आहेत.
Saturday, 26 February 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment