नवी दिल्ली, दि.२० : हिवाळी अधिवेशनात झालेल्या गोंधळानंतर आता संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाज सुरळीत होण्याची चिन्हे लोकसभा सभापती मीराकुमार यांनी आज बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर दिसू लागली आहेत. २-जी स्पेक्ट्रम घोटाळ्याची जेपीसी चौकशी करण्याची मागणी मान्य करण्यात आली असून, याची अधिकृत घोषणा अधिवेशनाच्या प्रत्यक्ष कामकाजाच्या पहिल्या दिवशी म्हणजे येत्या मंगळवारी करण्यात येईल, असे आश्वासन सभागृहाचे नेते व अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी विरोधी नेत्यांना दिल्यानंतर अधिवेशन काळात सभागृहातील कामकाज सुरळीतपणे चालण्याचे संकेत सर्वच पक्षांकडून मिळाले आहेत.
उद्यापासून सुरू होत असलेले संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरळीपणे पार पडण्यासोबतच ङ्गलदायीदेखील ठरेल अशी आशा पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी व्यक्त केली असून, विरोधकांनी उपस्थित केलेल्या कोणत्याही मुद्यावर सभागृहात चर्चा करण्यास सरकार तयार असल्याचे म्हटले आहे.
‘या अधिवेशनात अंदाजपत्रक पारित करण्यासह इतरही महत्त्वाचे संसदीय कामकाज पार पाडायचे आहे. त्यामुळे हे अर्थसंकल्पीय अधिवेशन अत्यंत महत्त्वाचे आहे,’ असे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी आज लोकसभेच्या सभापती मीराकुमार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले. भ्रष्टाचाराच्या मुद्यावर जेपीसी स्थापन करण्याच्या विरोधी पक्षांनी केलेल्या मागणीच्या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीबद्दल आपण समाधानी आहात का, असे विचारले असता ‘मी कायम समाधानी असतो’ असे पंतप्रधान म्हणाले. याबाबतही मी आशावादी आहे, असेही डॉ. सिंग पुढे म्हणाले.
Monday, 21 February 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment