-टोळीचा हात असल्याचा पत्नीचा आरोप
डिचोली, दि. १६ (प्रतिनिधी) - वाळपईचे पोस्टमास्तर प्रकाश गाडगीळ यांच्या आत्महत्येमागे रसिका हिचाच हात असून तिने छळवणूक सुरू केल्यानेच आपल्या नवऱ्याने आत्महत्या केली. तसेच, तिच्या मागे एका मोठ्या टोळीचा हात असून अशा प्रकारे ती अनेकांना लुटत असावी, असा दावा गाडगीळ यांच्या पत्नी प्रज्वलिता यांनी केला आहे. पोलिसांनी तिची कसून चौकशी केल्यास अनेक गोष्टी बाहेर येऊ शकतात, असे तिने यावेळी सांगितले. दरम्यान, वाळपई पोलिसांनी रसिका हिच्या विरोधात गुन्हा नोंद केला असून तिला केव्हाही अटक केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली. तिच्या विरोधात खंडणी आणि आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे, अशी माहिती विभागीय पोलिस उपअधीक्षक बोसुयट सिल्वा यांनी दिली.
पोलिसांनी सुरू केलेल्या तपासकामात रसिका ही गाडगीळ यांना "ब्लॅकमेल' करीत असल्याचे उघड झाले असून तिच्या खात्यात पैसेही जमा करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे रसिकाचे बॅंक खाते गोठवण्यात आले आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
दि. १८ एप्रिलच्या मध्यरात्री गाडगीळ यांनी धावे येथे आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. यावेळी पोलिसांनी घरात तपासणी केली असता त्यांना मराठीत लिहून ठेवलेली एक चिठ्ठी सापडली होती. त्यात " आपली मैत्रीण रसिका ऊर्फ रशिगंधा नाणूस येथे राहणारी ही आपल्या मोबाईलवर टिपलेले काही छायाचित्र दाखवून पैशांची मागणी करीत आहे. तसेच पैसे न दिल्यास हे छायाचित्र सर्वत्र प्रसिद्ध करू अशी धमकीही देते ' असे यात म्हटले होते. तसेच काही मोबाईलचे क्रमांकही या चिठ्ठीत दिले होते. या क्रमांकावरून धमकी दिली जात असल्याचा उल्लेख त्यांनी केला होता. तसेच तिने आपला विनयभंग केल्याची खोटी तक्रार पोलिस स्थानकात देणार असल्याचे सांगूनही धमकावल्याचे म्हटले या पत्रात गाडगीळ यांनी म्हटले आहे.
"आम्ही या चिठ्ठीतील हस्ताक्षर गाडगीळ याचेच असल्याचे तपासण्यासाठी त्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले असून त्याच्या अहवालाची वाट पाहत आहोत', असे श्री. सिल्वा यांनी सांगितले.
रसिका हिच्याबरोबर अन्य पाच जणांचा सहभाग असल्याचा आरोप प्रज्वलिता हिने केला आहे. वाळपई पोलिस स्थानकात रसिकाने जबानी देताना म्हटले होते की, आपल्या ब्युटी पार्लरसाठी लागणारे सामान हे पोस्टातून येत होते. ते आणण्यासाठी आपण पोस्टात जात असे. यावेळी प्रकाश गाडगीळ यांनी आपल्याशी सुत जुळवण्याचा प्रयत्न केला असता मी त्याला दटावले. तेव्हा तो माफी मागायला लागला असता मी त्याच्याकडे पैसे मागितले, अशी माहिती प्रज्वलीता हिने यावेळी दिली.
वाळपई भागातीलच काही व्यक्तींचा या प्रकरणात समावेश आहे. त्यामुळे गावातील अनेकांनी मला सहकार्य केले नाही, असा दावा तिने केला आहे. पोलिसांनी सुरुवातीला या प्रकरणाचा तपासकाम करायला हलगर्जीपणा केल्याने संशयितांनी त्यांच्या संगणकावरील महत्त्वाची माहिती नष्ट केली. पोलिस रसिकाबरोबर असलेल्या संशयितांची चौकशी का करीत नाही, असा सवाल तिने उपस्थित केला आहे. या सर्व गोष्टीमुळे मला गाव सोडणे भाग पडले असल्याचेही ती यावेळी म्हणाली.
...तेव्हाच मंगळसूत्र काढेन
प्रकाश गाडगीळ आत्महत्या प्रकरणातील मुख्य संशयित रसिका ऊर्फ रशिगंधा शेट्ये हिला शिक्षा झाल्यानंतरच गळ्यातील मंगळसूत्र काढेन व कपाळावरील कुंकू पुसेन, अशी प्रतिक्रिया गाडगीळ यांच्या पत्नीने आज "गोवादूत'शी बोलताना व्यक्त केली.
Tuesday, 17 August 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment