श्रीनगर, दि. १६ - जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील सोरन घाटीतील (ठाणामंडी तालुका) घनदाट जंगलात राष्ट्रीय रायफल्स आणि पोलिस यांनी संयुक्तपणे दहशतवाद्यांविरुद्ध सुरू केलेली कारवाई ५० तासांनंतर संपली आहे. सलग तीन दिवस चाललेल्या या कारवाईत कारवाईत तिघे दहशतवादी ठार झाले असून ३८व्या राष्ट्रीय रायफलचा एक जवान (एस के सिंह) शहीद झाला आहे.
मेजर सुशील महापात्रा, खास अधिकारी इफ्तिकार मलिक, हवालदार नासीर अहमद आणि अद्बुल रझाक हा नागरिक असे तिघे या कारवाईदरम्यान जखमी झाले आहेत. मेजर महापात्रा यांना गंभीर जखमी झाल्यामुळे लष्कराच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अन्य तिघांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, चकमकीत ठार झालेले दहशतवादी लष्कर-ए-तोयबाशी संबंधित असल्याचे उघड झाले आहे. त्यांची ओळख पटली आहे. दहशतवाद्यांची नावे अनुक्रमे सज्जद काश्मीरी, अबू कामरान आणि झरगर अशी आहेत.
Tuesday, 17 August 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment