Editor: Gangaram Mhambre
Tel: 0832-2421101, 2422879. Emails: goadoot@rediffmail.com, goadoot@gmail.com.

Sunday, 15 August 2010

'गुगल'वर भारतात 'बंदी'ची शक्यता

सिंगापूर, दि. १४ : सुरक्षेच्या कारणास्तव 'गुगल', 'स्काइप' या इंटरनेट ब्राऊजर्सवर भारतात बंदी येण्याची शक्यता आहे.
सध्या याच कारणावरून 'ब्लॅकबेरी' या मोबाईल सेवा देणाऱ्या कंपनीवर बंदी घालण्याचा विचार सुरू आहे. इंटरनेटच्या माध्यमातून सेवा देणाऱ्या कंपन्यांबाबत सरकार चिंतेत आहे. दूरसंचार मंत्रालय व गृह मंत्रालय यांच्यामध्ये झालेल्या बैठकीमध्ये याबाबत विचार करण्यात आला असून सरकार तातडीने महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे. ब्लॅकबेरीबाबतचा निर्णय सरकार ३१ ऑगस्टपर्यंत घेणार आहे. ब्लॅकबेरीच्या निर्णयानंतर सरकार गुगल व स्काइपवरील बंदीबाबत विचार करणार आहे. गूगल, ब्लॅकबेरी, स्काइप यांच्या माध्यमातून माहिती, छायाचित्रे, सूचना सहजपणे आदान-प्रदान करता येऊ शकतात. यावर नियंत्रण ठेवणारी कोणतीही यंत्रणा अस्तित्वात नाही. त्यामुळे दहशतवादाचा प्रसार होण्याचा धोका सरकारने व्यक्त केला आहे. भारतात 'गुगल'चा सर्वाधिक वापर केला जातो. अंदाजे ४ कोटी नागरिक गूगलचा उपयोग करतात. जगातील इतर देशांमध्ये गुगल व स्काइपचा वापरही जास्त आहे.

No comments: